22)सावित्रीच्या लेकी विशेषांकासाठी लेक वाचवा
लेक शिकवा
वाचवा बेटी धनाची पेटी
मुलगी वाचवा....
स्त्री भृण हत्या थांबवा...
या ओळीप्रमाणेच आपण स्त्री भृण हत्या थांबवू शकतो. मुलगी ही धनासारखी असते. जर ती घरामध्ये नसली तर घर एकदम भकास वाटते. ज्याप्रमाणे आत्ताच्या यूगात स्त्री भृण हत्या फारच चालू आहे.त्यावर उपाय म्हणून आपण लेक वाचवली पाहिजे.पण आपल काम हे फक्त मुलगी वाचवणे नव्हे तर तिला शिकवले सुध्दा पाहिजे.पण आजही फार गावामध्ये लेकीचा जन्म झाला कि तिला जाळून टाकायचे किंवा तिला जिवंत पुरून टाकायचे. लेकीचे मह्त्व आपल्याला खालील ओळीत लगेचच समजून येतो,
जर मुलगा श्वास आहे.....तर मुलगी हृदय आहे.
मुलगा दिपक आहे...तर मुलगी ज्योत आहे.
जर मुलगा वारस आहे.....तर मुलगी पारस आहे.
जर मुलगा वंश आहे .......तर मुलगी अंश आहे.
जर मुलगा आन आहे....तर मुलगी शान आहे.
जर मुलगा तन आहे...तर मुलगी मन आहे.
जर मुलगा संस्कार आहे...तर मुलगी संस्कृती आहे.
जर मुलगा दवा आहे...तर मुलगी दुआ आहे
जर मुलगा भाग्य आहे...तर मुलगी विधाता आहे.
जर मुलगा शब्द आहे...तर त्या शब्दाचा अर्थ आहे.
जर मुलगा गीत आहे...तर मुलगी संगीत आहे.
जर मुलगा दौलत आहे...तर मुलगी खजाना आहे.
जर मुलगा दिल आहे....तर मुलगी धङकन आहे.
आजच्या युगात प्रत्येक घरामध्ये लेकीचे मह्त्व फार असले पाहिजे असते.पण असे नाही आहे.प्रत्येक घरामध्ये आजही भेदभाव चालूच आहे. आजच्या युगात मुलगा आईवडीलांच्या मालमत्तेमध्ये हक्क मागतो.आई वडिलांसोबत चांगले वागत नाही.पण मुलगी मात्र आईवडीलांना ह्या परिस्थितीतुन सावरते.ती आईवडीलांचे एवढे मोठे मोठे काम करते.पण आईवडीलांना एक पैसाही मागत नाही.
जर मुलीचा जर जन्म झाला तर ती आपल्या घरात लक्ष्मी सारखीच राहते.नात्यामध्ये दरार पडत चालली आहे.मुलीचा जन्मदर घसरत चालला आहे.मुलगी ओझं वाटू लागतं.पण ती दोन कुळाचा उद्धार करते हे आपल्याला विसरुन चालणार नाही.
लेक लाडकी ह्या घरची,
होणार सुन मी त्या घरची.
जर आई पाहिजे
पत्नी पाहिजे
बहिण पाहिजे मग
मुलगी का नाही पाहिजे.
खेङे गावामध्ये मुलीला शिक्षण सुध्दा नीट दिले जात नाही.मुलीचा जन्म झाला की तिला चुल आणि मुल एवढेच काम असते.धुणीभांडी घासण्या पासुन ते स्वयंपाका पर्यत सर्व काम ती लहान वयामध्येच शिकते. ज्या वयामध्ये तिच्या हातात पाटी पेन्सिल पाहिजे त्या वयात तिच्या हातामध्ये भांडे आणि कपडे असतात.त्या लोकांना मुलीचे मह्त्व कोणीच निट समजावून सागत नाही.जर आपण मुलीला चांगले शिकवले की.ती शिक्षणाचे महत्त्व सगळ्याना पटवून देईल
जर एक पुरूष शिकला
तर तो एकच शिकतो
पण जर एक स्त्री
शिकली की पुर्ण कुटुंब शिकते.
बाबा बाबा मला जन्माला येऊ द्या हो.मी कशाचाच हट्ट नाही करणार.मी सणाला नवे कपडे पण नाही मागणार.मला पण हे सुंदर जग पाहू द्या हो बाबा.मी तुम्हाला त्रास नाही देणार.पण मला पण शाळेत जायचं आहे.पण मी दादाचे जुने पुस्तक,पाटी घेइल पण मी तुम्हाला जास्त खर्चात नाही टाकणार.आता शासनाचा मुलीच्या शिक्षणावर खुप भर आहे.जिल्हा परिषदच्या शाळेत कपडे,पुस्तके,गुणवंत विद्यार्थाना स्काँलरशिप पण मिळते.तर मग घेऊ द्याल ना बाबा मला जन्म.मी खुप शिकणार हो बाबा.अन मी मोठ होऊन तुमचं ना पण कमावणार हो बाबा.
नका मारु मला आईच्या उदरात
घेऊ द्या जन्म मला या सुंदर जगात.
चला तर मग आज पासुन आपण एक नवा प्रण.व एक नवा ध्यास घेऊ या प्रत्येक लेकीला प्रगत करु या प्रत्येक मुलीच्या मणामध्ये शिक्षणाचे महत्त्व पटवून देऊ या जेणे करुन ती पुढे चालुन तिच्या हक्कासाठी एकटीही लढु शकेल जर ती मुलगी शिकली तर ती तिच्या मुलांना कूटुंबातील व्यक्तीना शिकवेल व तिचे मुले दुसऱ्याना शिकवेल आणि दुसऱ्या च्या मणामध्ये शिक्षणाचा प्रण घालेल मी जो लेख लिहिला आहे हया लेखामधुन तुम्हाला लेकीचे महत्त्व चांगलेच पटले असेल ही आशा करते.
धन्यवाद.
रेखा शिंदे औरंगाबाद
जि.प.प्रा.शाळा मतेवाडी
21)आजची शिक्षण पध्दती व पारंपरिक शिक्षण _लेख श्रीम. मनिषा अंबादास जाधव जि.प.शाळा, रवंदे ता.कोपरगाव जि.अ.नगर mob no.8605750395 "Education is an instrument which changes man into complete man" "मानसिक गुणांचे आणि दोषांचे उच्चाटन करते ते शिक्षण ". जगात वावरण्यासाठी , स्वत :चा सर्वांगीण विकास करून घेण्यासाठी आवश्यक असणारे ज्ञान म्हणजे शिक्षण. आजवर आपण अनेक वेळा भारतातील प्राचीन गुरूकुल शिक्षण पध्दतीविषयी ऐकले असेल या शिक्षण पद्धतीत गुरुंच्या घरी जाऊन शिक्षण घेणे, एवढाच अर्थ आपणांस ठाऊक असतो. पण गुरुकुल म्हणजे नेमके काय? तेथील दिनचर्या , अध्यापन पध्दती माहिती असणे गरजेचे आहे.गुरूकुल शिक्षण पध्दतीत अध्ययन अध्यापन बाबत विचार करायचा झाल्यास नवीन पाठाचा मागच्या पाठाशी संबंध असायचा. पूर्वावलोकन व्हायचे.पाठ सुरू करण्यापूर्वी आचार्य 10 मिनिटे आदल्या दिवशीचा पाठ कितपत समजला याची चाचणी घेत. नंतर नवा पाठ सुरू व्हायचा. विद्यार्थ्यांची तयारी होते की नाही हे रोजचे समजायचे म्हणजे रोजच परीक्षा व्हायची. ऋषीमुनींनी आपल्या आश्रमातून विद्यार्थ्यांना सामर्थ्यवान बनविणारे शिक्षण दिले. म्हणून आश्रमातून बाहेर पडल्यावर ते विद्यार्थी आत्मविश्वासाने जीवनाला सामोरे जात असे." जीवन ही एक कला आहे,जीवन सर्वतोपरी स्वयंपूर्ण रित्या आनंद, सामर्थ्य व स्वावलंबी कसे जगावे? "हे धडे आश्रमातून गिरवले जायचे. ब्रिटिश पूर्व काळात भारत हा ज्ञानार्जनाच्या म्हणजे शिक्षणाच्या शिखरावर होता.ब्रिटिशांनी देखील भारतीय शिक्षण प्रणाली ब्रिटिश मध्ये राबवली. परंतु ब्रिटिश राजवटीत लाॅर्ड मेकाॅलेने भारतात कुचकामी शिक्षण पध्दती अंमलात आणली. स्वातंत्र्य मिळूनही तीच शिक्षण पध्दती आजही चालू आहे.आजचे शिक्षण हे पूर्ण पुस्तकी स्वरूपाचे आहे. पुस्तकी माहिती ठराविक वेळेत उतरवून काढणे याला 'परीक्षा ' हे गोंडस दिले गेले. त्यामुळे विद्यार्थ्यांची स्वतंत्र पणे विचार करण्याची क्षमता नाहिशी झाली. आजच्या शिक्षण पध्दतीने मनुष्य सुशिक्षित होतो. पण सुजाण, सुसंस्कृत होतोच असे नाही. वास्तविक शिक्षण हा पवित्र संस्कार आहे. शिक्षण घेतलेली व्यक्ती सुसंस्कृत असायला हवी. पण दुर्दैवाने तसे न होता माणसे आत्मकेंद्रीत, स्वार्थी व संकुचित झालेली आढळतात. "Education system is the most dangerous web that is spreading and strengthening itself in the human society.
20)ही आवडते मज मनापासुनी शाळा....*
"अगं थांब, नीट जेवण तरी कर , अजून वेळ आहे शाळा भरायला." "केलं गं आई मी पोटभर जेवण आणि झालं माझं सगळं आवरून, आज आमच्या वर्गाचा परिपाठ आहे आणि आमच्या मॅडम आल्या पण असतील शाळेत. चालले मी" असं आईला सांगून धावत शाळेत येणारी माझी नंदिनी एकीकडे; तर
दुसरीकडे तिचाच चुलत भाऊ राहुल. तो यायचा बसायचा आणलेलं दप्तर घेऊन परत निघून जायचा.कुणाशीही बोलायचा नाही. गाणी,गप्पा, गोष्टी घेऊन त्याला बोलते करण्याचा खूप प्रयत्न केला पण काही उपयोग झाला नाही.काही दिवसांनी तर त्याने शाळेला येणंच सोडून दिलं. घरी भेटायला गेले, चॉकलेट्स दिले आईला समजावून सांगितलं पण काहीच फरक पडत नव्हता.तो शाळेभोवती फिरायचा पण शाळेत येत नव्हता. त्याला टायर खेळायला आवडते हे त्याच्या बहिणीने सांगितले.
मनात अजून एक आशेचा काजवा कुठेतरी चमकून गेला. कृतीयुक्त गीते, गोष्टी तर मी नेहमी घेतेच त्याबरोबर हे मनोरंजक खेळ घेतले तर.... मनाशी ठरवलं राहुलला शाळेत आणायचंच. दुसऱ्या दिवशी परत त्याच्या घरी गेले. गल्लीतील सर्व मुलं आगीणगाडीचा खेळ खेळत होती. मला पाहून राहुल घरात पळाला तर नंदिनी आमच्या मॅडम घरी आल्या म्हणून ओरडत सर्वांना सांगत होती.
मग मी मुलांना तुमच्याकडे जी जी खेळणी आहेत ती उद्या शाळेत घेऊन यायला सांगितलं. मग मी बाहेरूनच राहुलला आवाज दिला व उद्या येताना टायर घेऊन यायला सांगितलं.
दुसऱ्या दिवशी आतुरतेने वाट बघितली पण राहुल काही आलाच नाही. आम्ही वर्गात वेगवेगळ्या खेळांसोबत टायरचाही खेळ घेतला. शाळा सुटल्यावर मी नंदिनीला राहुलला टायरचा खेळ घेतल्याचं सांग असं सांगितलं आणि काय आश्चर्य दुसऱ्या दिवशी राहुल त्याचा छोटा टायर घेऊन दबक्या पावलाने शाळेत हजर झाला.मग काय आम्ही लगेच खेळाला सुरुवात केली आणि काय चमत्कार राहुल सर्वांशी हसतखेळत बोलू लागला,खेळू लागला. आता तो दररोज स्वतःचं आवरून, तयार होऊन शाळेत येतो. काही कामानिम्मित आईने लवकर बोलावले तरी घरी जात नाही. हळूहळू त्याच्या अभ्यासात पण प्रगती होत आहे. आता त्याला शाळेचा इतका लळा लागला आहे की तो सर्वात आधी येऊन साफसफाईत सहभागी होतो. मी नसताना कुणी दंगा केला याची माहिती देतो.मॅडम मी आज काय अभ्यास करू? असं आवर्जून विचारतो.खऱ्या अर्थाने त्याला शाळेचा आणि मला त्याचा लळा लागला आहे.
*शब्दांकन*
पद्मजा बोटलावार/ईडलवार
19) माझे नाविन्यपूर्ण उपक्रम
॥ माझ्या नाविन्यपूर्ण उपक्रमाने बाग फुलविली कोवळ्या फुलांची, त्यात फिरणारी मी फुलराणी मोठया भाग्याची ॥
माझी शाळा निवासी आदिवासी मुलांची असल्याने त्यांना शाळेची गोडी लागुन उपस्थिती कायम टिकून राहावी यासाठी मी.. नाविन्यपूर्ण उपक्रमातून अध्यापन करीत आहे. त्याचा सकारात्मक परिणाम मला दिसुन येत आहे. ते नाविन्यपूर्ण उपक्रम सर्वांना समजावे यासाठी हा माझा प्रयत्न...
वृक्ष वाचन_ परिसरातील झाडांवर पत्र्याच्या वाचन पट्या
लावल्या त्यामुळे विद्यार्थी वाचन लेखन करू लागले .
माझी विचार, कला तुमच्या भेटीला- थर्माकालच्या बोर्डवर विदयार्थी स्वयंस्फूर्तीने लेखन, कलाकृती लावतात. अभिव्यकी निर्मिती झाली.
ज्ञानारचना वादी स्वनिर्मित शै. साहित्य- विदयार्थी स्वयंअध्ययन करतात एकाग्रता वाढते.
माझे अक्षर किती सुंदर_विद्यार्थी रोज शुद्धलेखन सराव करतात त्यांची हस्ताक्षर स्पर्धा घेतली जाते.
भटकंतीतून संबोध, संकल्पना -आठवडे बाजार, दुकानात जाऊन गणितीय संबोध, परिसरातील डोंगर ,झाडे यातुन वैज्ञानिक भौगोलिक ज्ञान घेणे, जत्रा भरविणे
नाविन्यपूर्ण रांगोळी स्पर्धा- गणित विज्ञान अभ्यासक्रमावर.
उपक्रम छोटा फायदा मोठा- जुनी वर्तमानपत्रे, पुस्तके, मासिके, यांचा वाचनकोपरा आहे . त्यामुळे शब्द साठा वाढतो.
मन की बात- एक विषय दिला जातो त्यावर चर्चा घडविली जाते .
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर- संगणक , प्रोजेक्टरचा वापर केला जातो.
तसेच .. चला तारखेप्रमाणे पाढे म्हणुया, चालता बोलता अंताक्षरी, मिळवू या नवे ज्ञान प्रश्नमंजुषा, वनभाजी पाककला महोत्सव भेट .
बियाणे बँक- विद्यार्थी विविध बियाजमा करून बाजुच्याडोंगरावर लावतात.
पडीक जमिनीवर लागवड - मेथी, कोथंबीर.स्वनिर्मिती, स्वावलंबन शिकवण मिळते.
.. मायेची फुंकर- मी स्वतःकडुन, समाज सहभागातून दैनंदिन वापराच्या वस्तू विदयार्थांना मिळवून देते, वाढदिवस करणे.
वीर जवानांना पत्र लेखन- राष्ट्रभक्ती, देशप्रेम वाढविणे.
... हात धुवा मोहिमेतुन स्वच्छतेचे महत्त्व, शिकू या योगासने, संस्काराचे धडे गिरवू.. बालसंस्कार शिबीरातून, किशोरवयीन मुलींना समुपदेशन, विद्यार्थी संचिका प्रदर्शन, मैदानी खेळ विकासाचा मेळ.
एक पाऊल करीअरच्या दिशेने- वाती, माळा, कुंकू, राख्या साबण ,अगरबत्ती, सेंट,बनविणे ब्युटीपार्लर शिकविते.
सामाजिक जनजागृती- मतदार दिवस ,पोलिओ, स्वच्छता मोहीम जलसाक्षरता रॅली.
.... सर्व सणांचे रंग उधळू- पर्यावरणपूरक सण साजरे केले जातात.
आदर्श विद्यार्थी मुकूट - वर्षभरातील अवलोकनानेm आदर्श विदयार्थी निवड होते.....
......... सख्यांनो माझ्या विद्यार्थ्यांसाठी जशी ही नाविण्याची खाण खोदली, त्यातुन ज्ञानाची गंगा वाहू लागली. माझ्या ज्ञानमंदिरातील रत्नासारखीच रत्ने अजुन निर्माण व्हावी.
हीच सरस्वती माते जवळ मनापासुन प्रार्थना.
श्रीमती पाटील ज्योती रामराव धुळे.
18)महिला सक्षमिकरन काळाची गरज
महिला सक्षमीकरण करने समानता व सर्वांगीण विकासासाठी गरजेचे आहे.सर्वच महिलांना वैचारिक स्वातंत्र्य मिळणे म्हणजेच स्री सक्षमिकरण. महिलांना सामाजिक, आर्थिक, धार्मिक, सांस्कृतिक व वैचारिक पातळीवर समानता मिळणे म्हणजेच महिला सक्षमिकरण. महिलांना मोकळा श्वास घेता येणे म्हणजे महिला सक्षमिकरण होय.तसेच स्री ला स्वतंत्र घटक मानून ,तिला विकासाच्या प्रक्रियेत बरोबरिचा दर्जा देने म्हणजेच महिला सक्षमिकरण होय.यावरून महिला सक्षमिकरणाचा अर्थ स्पष्ट होतो.
परंतु आपल्या देशातील महिला अजूनही दुय्यम स्थानावर आहेत व अजूनही त्या आर्थिक व सामाजिक दृष्टया दुर्बल आहेत.
महिला सक्षमिकरण या प्रक्रियेत महिलानाच नव्हे तर महिलांसम्बधि अनेक घटकाना सशक्त बनविन्याची गरज आहे.
अन्न ,वस्र, निवारा या प्राथमिक गरजासह सुरक्षितता देखील महिलांना दिली जावी.तसेच शिक्षण आणि महिला सक्षमिकरण या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.शिक्षणामुळे महिलांना बाहेरचे जग पाहता येते व त्यातील व्यवहारा चा परिचय होतो.स्वतःचे हक्क अधिकार ई के ज्ञान मिळते मित्र मैत्रिणी व सहकारी यांच्या बरोबर आपल्या समस्या वर मोकळेपणाने बोलता येते. मनोबल वाढते व अनेक समस्या वर तोडगा काढता येतो.
तसेच महिलानी स्वतसाठी वेळ काढ़ावा.स्वता मधे विश्वास व आत्मभान जागृत करावे,लहान-सहान निर्णयासाठी इतरांवर अवलंबून राहु नये, नैतिक मूल्याचा विकास करावा,स्रीवादी व उपेक्षा प्रधान वक्तव्यावर आक्षेप घेन्याचे धाडस करावे.
तसेच घर घरातील कामे, मुलांचे संगोपन यात महिला
अधिक वेळ अडकल्याने त्यांच्यात
अनेक गुण व कौशल्य असूनही त्या मागे राहतात.म्हणुन महिलानी स्वता जाणीव ठेऊन संधी मिळताच स्वताला सक्षम बनविन्याचा विचार करावा, असे जर झाले तर महिला सक्षमिकरणाचा वेग वाढुन ते सहज साध्य करता येईल.
महिला सक्षमिकरणाचा सखोल अभ्यास करून त्या दिशेने पावले उचल्ल्यास व धोरण अमलात आल्यास महिला सक्षमिकरण पूर्णतः साधता येईल.
धन्यवाद!
नाव-धनश्री गजमल गांगुडेँ
शाळा-महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विध्यालय ,दुगांव
ता-चांदवड
जि-नाशिक
17)व्यसनांचे दुष्परिणाम
'व्यसनाचा अजगर भूकेला अाहे
अाज तरूण वर्ग त्याचा शिकार
समस्या नाही असं जीवन नाही
त्याविना जगण्याला चवचं नाही
जगताना लहान,मोठ्या हेलकाव्याने आयुष्याची नाव वाहत असते.नावाडी तर आपणच असतो ती कशा प्रकारे सुरक्षित किनारी न्यायची हे आपल्याच हातात असते.आलेल्या प्रत्येक संकटाला तोंड देत जगावे लागते.आशेचा किरण तिमिराला भेदत असतो.संकटाला घाबरणे यातुन निर्माण झाली ती मोठी समस्या म्हणजे 'व्यसन'.
आज २१ व्या शतकात या व्यसनाने आपले विस्तारित रुप प्रकटीले आहे.थैमान घातले आहे.समाजात याचेच अधिराज्य आहे.विशेष म्हणजे भारताचे आधारस्तंभ तरूण वर्ग व्यसनाच्या अधीन जास्त आहेत.समाज व्यवस्था खिळखिळी होताना दिसतय.आणि याचे सोयरसुतक व्यसनाधिनांना नाही.चैनी व मश्गुल जिंदगी जगणे प्रतिष्ठा बनली आहे.मनाचीही नाही अन जनाचीही लाज ,अब्रु वेशीला टांगुन मज्जा घेत जगणे आवडते झाले.यात स्वकीयांची व स्वतःच्या जीवाचीही पर्वा हे महाभाग करत नाहीत.
" 'अरे व्यसन व्यसन नेई
मरणाच्या दारात
अरे व्यसन व्यसन करी
जीवनाची वाताहात"
लहानपणी जडणघडण होताना आवडीनिवडीतून सवयी लागतात.काही सवयी चांगल्या तर काही वाईट असतात.पण वाईट सवयी लवकर जडतात.काही सवयी गमंत म्हणून तर काही फॅशन म्हणुन अंगवळणी पडतात.त्याच मग माणगुटीवर बसून घात करतात.हे कळायला खूप उशीर होतो.
वाईट व्यसन कोणतेही असो ते शरिराला घातकच असते.व्यसन नलागणे ही हातातली गोष्ट आहे.मनावर ताबा असला की या पासून चार हात लांब राहता येते.जगावं तर सगळ्यालाचं वाटतं.मरणाचीही भिती असते.पण या महान विभूतीलि समजावे कुणी?ते स्वतःच बादशहा असतात.मी म्हणेल तीच दिशा पूर्व अशी गत त्यांची असते.
व्यसनांचे अनेक प्रकार आहेत.सगळे घातकच.या व्यसनामूळे मन, बुद्धी कार्य करत नाही.मानसिक ञास होतो.बरेच पैसे खर्च होतात.स्वतःवर ओढवलेलं हातचं दुखणं हे व्यसन.दैनंदिन जीवनावरही हे परीणाम करते.ऐन परिक्षेच्यावेळी बिमार पडणे,अपेक्षित यश प्राप्त न होणे,घराघरांत तंटे वाढतात,लग्न जमत नाहीत,जमलेली लग्न टिकत नाहीत,मूलांबाळांच आयुष्य भरकटतं,मूलबाळं न होणं,मुलं जन्मा आली तरी मतीमंद_विकलांग जन्मणे,व्यवसायात वृद्धी न होणं,दारिद्र्य येणं,शारिरीक व्याधी जडणे अशा नानाविध समस्या या व्यसनाने आयुष्याचं वाटोळ करतात.
सिगारेट,दारू,तंबाखू,गुखा,मावा,चरस,गांजा,ड्रग्ज अशा मादक पदार्थाच्या सेवनाने घसा ,दात,फुफुसे,ह्रदय,जठर,मुञपिंड,श्वसनस्ंस्था,पचनसंस्था इ.वर विपरित परिणाम होतात.
बाळ्या येड्या रताळ्या
खाऊ नको तंबाखू गूटखा
होईल टिबी कॅन्सर
लाविल जीवाला चटका'
अमेरिका,चीन,भारत हे देश व्यसनात अग्रेसर आहेत.यात भारत प्रथम क्रमांकावर आहे.असे संशोधनातून सिदध झाले.
व्यसन करण्यासाठी मनाचा कमकुवतपणाही कारणीभूत असतो.संकटावर सहज विजय मिळवण्याचे औषध म्हणून दारु, तंबाखू,ड्रग्ज ची वाट धरतात.हेच सवय बनते.नंतर आहारी जाऊन वेळत न मिळाल्यास बैचेन होतो.बंद करायला गेल्यास वैफल्य येत.पून्हा तो त्या गरजेशिवाय जगूच शकत नाही.अशी वेळ येते की आत्महत्या किंवा मरण याला पर्यायच नसतो.
एक विशेष म्हणजे गरिबापेक्षा श्रीमंताला हे लवकर लागते.तंबाखू हे हळूहळू भिणणारे विष आहे यामूळे तोंडाचा,जबड्याचा,घशाचा कॅन्सर होतो.
अशा व्यसनामूळे जीवन उद्धवस्त होते.वेळिच यावर प्रतिबंध घातला पाहिजे.कायद्यानेच कठोर कारवाई करणे योग्य आहेच शीवाय घराघरातून माणसिकता बदलली पाहिजे."सूसंगती सदा घडो,सुजण वाक्य कानी पडो" या उक्तीची सवय पाल्यांना देणे गरजेचे आहे.पालक निर्व्यसनी असावा.पैशाच्या मागे धावणार्या पालकांना मूलं घडविण्याचं प्रशिक्षण देणं गरजेचं आहे.मुलांमध्य अात्मविश्वास,प्रबळ ईच्छाशक्ती निर्माण करावी लागेल.सगळेच हट्ट पूरवायचे नसतात कधी कठोर पण झालं पाहिजे.हे आपल्या पालकांच्या हातात आहे.असे सर्वांनी केले तर विनाश होणे टाळता येतो.
म्हणून पालकांनो ऊठा ,जागे व्हा!
देशाला वाचवा.नाहीतर विधव्सं........बघा पटतयं का?
रावते ज्योती
नांदेड
16) माझी शाळा माझे उपक्रम
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंदिरानगर तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड ही माझी छोटीशी वस्ती शाळा. सन 2001 ते 2011 पर्यंत एका छोट्याशा पत्र्याच्या खोलीत चालणारी ही वस्तीशाळा आज एका सुसज्ज इमारतीत भरणारी तालुक्यातील एक आदर्श गुणवत्तापूर्ण आणि उपक्रमशील शाळा म्हणून गौरविली जात आहे .मी या शाळेची मुख्याध्यापिका आहे याचा मला निश्चितच अभिमान वाटतो .या शाळेत मी 2014 सालीरूजू झाले .तोपर्यंत शाळेची ओळख फक्त एक वस्तीशाळा अशीच होती .
शाळेत रुजू झाल्यानंतर मी पहिलीत प्रवेश मिळवण्यासाठी सर्वेक्षण करताना मुलांना माझ्या शाळेत प्रवेश घेण्यासाठी आग्रह करीत होते, एक चिमुकला, "मी तुमच्या शाळेत शिकायला येणार नाही." असे ठामपणे म्हणाला . त्याच्या धाडसाचे कौतुकही वाटले आणि मनात प्रश्न निर्माण झाला .त्याला प्रवेश न घेण्याचे कारण विचारले असता ,"शाळेला चांगला रंग नाही, म्हणून मला ही शाळा आवडत नाही, दुसऱ्या शाळेची इमारत छान आहे ".असे उत्तरला .त्या चिमुकल्याचा भावस्पर्शी उत्तराने मन विचार करण्यास प्रवृत्त झाले .आणि सर्वप्रथम शालेय इमारत आकर्षक बनवायचीच असा मी निर्धार केला .
लोकवाट्याची अपेक्षा न ठेवता केवळ शिक्षक सहभागातून आकर्षक अशी रंगरंगोटी शाळेला आम्ही केली.चार महिला शिक्षिका मिळून विविध नाविण्यपूर्ण उपक्रम शाळेत सुरू केले. सर्वजणी झपाट्याने कामाला लागलो. शाळेत अंतर्बाह्य बदल घडवून अवघ्या दोन वर्षात शाळा नावारूपाला आणली . शाळेची पटसंख्या तर वाढलीच शिवाय गुणवत्ताही वाढली.
माझ्या शाळेत पुढील उपक्रम राबविले जातात.
१) निरोगी विद्यार्थी पुरस्कार .
२)नियमित विद्यार्थी पुरस्कार .
३)पाठांतर स्पर्धा .
४)खेळातून गणित.
४)वाढदिवस साजरे करणे.
५)आदर्श विद्यार्थी पुरस्कार .
६)प्रामाणिक विद्यार्थी पुरस्कार .
७)परिपाठात उत्कृष्ट विद्यार्थी कौतुक .
८)सामान्य ज्ञान स्पर्धा .
९)क्रीडा आणि सांस्कृतिक उपक्रम .
१०)कार्यानुभव प्रात्यक्षिके .
अशा प्रकारच्या विविधांगी उपक्रमातून विद्यार्थ्यांची पाऊले आपसुकच शाळेकडे वळतात आणि खिळूनही राहतात.
विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत शिक्षकांचा मोलाचा वाटा असतो . जेणेकरून अशिक्षित , गरीब आणि निम्न स्तरातील पालकांच्या पाल्यांसाठी कार्य करतांना तर ही जबाबदारी अधिकच वाढते.
म्हणूनच आम्ही सजग राहून आपले दायित्व ओळखून विविध उपक्रमांच्या सहाय्याने शाळेचा विकास साधण्याचा प्रयत्न करीत आहोत. यातून मिळणारे आत्मिक समाधान निश्चितच अलौकिक आहे....
(आम्ही सावित्रीच्या लेकी विशेषांकासाठी)
सौ. रूपाली कांतराव गोजवडकर - नांदेड .
13 )मी सावित्रीची लेक
आई सावित्री तुझ्या कृपेने आज इथे मी आले
शिकले-सवरले या देशाची शिक्षिका मी झाली.
खरंच आज मी जी काही आहे ते केवळ सावित्री मुळीच आहे कारण जन्म तरी आईवडलांनी दिला असला तरी त्या जन्माला खरा अर्थ आई सावित्री मुळेच आला. जर सावित्रीने स्त्री शिक्षणाचा पाया घातला नसता तर आज मी सुद्धा चूल आणि मूल यातच गुरफटून राहिले असते. आज या जगात मी मोकळा श्वास घेऊ शकते ते केवळ माई सावित्रीच्या अमूल्य अशा कार्यामुळेच.
मीच काय आज भारतातील असंख्य स्त्रिया प्रगतीपथावर पोचल्या, विकासाचे प्रत्येक क्षेत्र पादाक्रांत केले ते केवळ सावित्रीच्या पुण्याईनेच पण कधी कधी खेदाने म्हणावे लागते की अजूनही आमच्या काही सुशिक्षित भगिनी अनिष्ठ रूढी परंपरा,व्रत वैकल्ये,व पोथी पुराण वाचण्यात आपला वेळ घालवतात.
शिक्षण केवळ पदवी मिळवण्यापूरते आणि नोकरी मिळवण्यापूरते घेतात पण त्या शिक्षणाचा अर्थ समजून घेऊन आचरणात आणत नाही .. काहींच्या बाबतीत तर सांगताना दया येते कारण काही महिला बाहेर अगदी आधुनिक पद्धतीने वावरताना दिसतात ,जसे - आधुनिक पेहराव ,गाडी घेऊन फिरतात मात्र घरी आल्यानंतर आपल्या जुन्या रूढी समजुती,अनिष्ठ प्रथा जपतात.
हे पाहून मनात कविता सुचते...
परी खंत मज एकच आई
आमच्या भगिणीसाठी
विद्या विभूषित तरीही फिरती
अंधश्रद्धेच्या पाठी
कधी वाटते ज्ञान दिले तू सारेच वाया गेले....
कारण माई सावित्रीला अशा दोराही स्त्रिया मुळीच नको होत्या. स्त्री ही विचाराने प्रगल्भ व्हायला हवी,बाह्य दिसण्यावरून स्त्री ची प्रगती झाली असे मुळीच समजू नये. आणि विचाराची प्रगल्भता तेव्हाच वाढेल जेव्हा प्रत्येक स्त्री सावित्रीच्या विचाराला समजून घेईल.
आजची स्त्री शिक्षित झाली ,कमावती झाली ,सुपर वुमन म्हणून मिरवत आहे पण खरंच अशा किती स्त्रिया आहेत ज्या विचाराने सुपर वुमन झाल्यात. आज जग कितीतरी पुढे चाललंय, सोबत पुरुष मंडळी ही बरीच प्रगती करताना दिसत आहेत मात्र माझ्या सावित्रीच्या लेकी अजूनही इतक्या संधी,आरक्षण मिळूनही फारशा पुढे गेलेल्या नाहीत याला कारण दुसरे तिसरे कोणी नसून त्या स्वतःच आहेत.अजूनही प्रतिकार करण्याचं ,स्वतः निर्णय घेण्याचं धाडस करत नाही . स्त्रीने स्वतःच अस्तित्व जपायला हवं.
मी सावित्रीची लेक आहे ,मला विचाराने खंबिर होऊन इतर स्त्रियांना खंबीर करायचं आहे हा विचार प्रत्येक स्त्री ने जपायला हवा.
निसर्गाने स्त्रीला मातृत्व शक्ती बहाल करून मोठे वरदान दिले आहे. प्रेम,वात्सल्य ,सहनशीलता ही पुरुषापेक्षा स्त्रियांमध्ये जास्त असते याचा फायदा स्त्रीने योग्य रीतीने घेतला तर सावित्रीची लेक नक्कीच ठरेल.
माझ्या अस्तित्वाची ओळख खऱ्या अर्थाने माई सवित्रीमुळेच झाली.मला जो मान ,सन्मान ,पुरस्कार मिळाले ते केवळ सावित्रीच्या पुण्याईने च.
मला अभिमान आहे की मी स्त्री जातीत जन्म घेतला आणि सवित्रीचा वसा पुढे नेण्यासाठी मी माझ्या परीने सदैव प्रयत्न करेन.
आज राज्य उपक्रमशील शिक्षिका समूहाच्या माध्यमातून मी महाराष्ट्रातील हजारो स्त्रियांना एकत्र करून आम्ही महिला कुठेही कमी नाही आहोत हे ठणकावून सांगण्याचे धाडस प्रत्येक महिलेत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे आणि सावित्रीच्या विचाराच महत्व बऱ्याच स्त्रियांना कळत आहे...हे आमचं यश आहे
आधुनिक तंत्रज्ञानात सुद्धा सावित्रीच्या लेकी मागे नाहीत फक्त प्रत्येक स्त्रीने स्वतःला ओळखावे व सावित्रीच्या विचारांना घेऊन पुढे जावे म्हणजे तिला यशाच्या शिखरावर जाण्यास कोणीच रोखू शकत नाही...
शेवटी एकच म्हणेन..
अमुच्यासाठी किती यातना किती कष्ट उपसले..
सनातनी रितीच्या पोटी ज्ञानखंजिर खुपसले..
अबला नारी सबला झाली
सक्षम अशी मी झाले...
शिकले सावरले या देशाची
शिक्षिका मी झाले...
🖋करुणा गावंडे
समूह प्रशासिका
राज्य स्तर उपक्रमशील शिक्षिका समूह
9)सोशल मिडिया"
माणूस हा समाजशील प्राणी आहे. प्राणी आणि मानवात नैसर्गिक गरजा ही समान गोष्ट! पण विशेषावत्वाने लाभलेली बुद्धी ही मानवाला लाभलेली दैवी देणगी आहे. ह्या बुद्धीच्या जोरावरच माणसाने माहिती तंत्रज्ञान युगात केलेला प्रवास अचंबित करणारा आहे.
समाजाशी संवाद साधनं,अभिव्यक्त होणं ही माणसाची नैसर्गिक भूक आहे आणि ती शमवण्यासाठी त्याने वेगवेगळ्या माध्यमांचा शोध लावला. आधुनिक क्रांतीने एक प्रभावी माध्यम माणसाच्या हातात दिले ते म्हणजे हाताहातात असणाऱ्या यंत्राच्या रुपात, म्हणजेच इंटरनेटच्या माध्यमातून माणूस सोशल नेटवर्किंग मध्ये रममाण झाला न्हवे ,तर ते त्याच्या आयुष्याचा एक भाग बनला आहे. सोशल मिडियाचा शोध लावून माणसाने जग इतक्या जवळ आणले पण माणसाने माणुसकीला मात्र दूरवर नेऊन सोडले. त्यामुळे ह्या सोशल मिडियाच्या विचार मंथनाची गरज निर्माण झाली.
काय आहे हे सोशल मिडिया?सोशल मिडिया अशी समाज माध्यमे ज्यांच्या माध्यमातून समाजाला एकत्र जोडून ठेवण्याचे काम केले जाते. किंबहुना समाज प्रबोधन केले जाते. सामजिक संवादाचे माध्यम जसे की फेसबुक ,वॉट्सआप, हाईक, स्कायीप, लिंकडइन ,युट्यूब , स्नॅपचाट ,इन्स्टाग्राम अश्या असंख्य समाजाच्या पसंतीस उतरलेल्या साईट्स! आधुनिक क्रांतीत सोशल मिडियाने तरुणांच्या मनावर गारुड केले आहे.त्यामूळे हे नेटवर्किंग अपाय ठरू लागतयेत की काय अशी भीती निर्माण झाली आहे. ह्या गोष्टी जेवढ्या झपाट्यानं माणसाच्या हातात आल्या त्या वेगाने त्यांची साक्षरता आपल्यापर्यंत पाहोचलेली नाही आणि म्हणून ह्या फॅडचे परिणाम तरुण वर्गात जास्त प्रमाणात दिसू लागले आहेत. ७०% गुन्हे हे सोशल मिडीयाच्या माध्यमातून घडल्या गेल्याचे विदारक सत्य समोर आलेले दिसते.ही सोशल नेटवर्किंगची साधने म्हणजे जणू अफ्फुची गोळीच! ह्याचे व्यसन लागले की दिवस काळात नाही आणि रात्र काळात नाही, अशी आज अवस्था झाली आहे .जगाशी कान्हेक्टड राहताना आपल्या घरातील माणसे , शेजारी यांच्याशी जर तुम्ही डिस्कन्हेक्टड राहणार असाल तर मग काय उपयोग?त्यामुळे जग जवळ आले तरी माणूस मात्र माणसापासून दूर चालला आहे.घराघरातील संवाद आज हरवलेले दिसतात. त्यामुळे ह्याबाबदची सकारात्मक साक्षरता समजून घेण्याची गरज निर्माण झाली आहे .
नाण्याला दोन बाजू असतात त्याप्रमाणे सोशल मिडियाचा वापर काही तरुणांनी फार चांगल्या प्रकारे केल्याचे दिसून येतोे. उदाहरणार्थ अमरावतीतील माणुसकीची भिंत आणि बारामतीतील मायार्थी सौंस्थेचे कार्य अश्या प्रकारे एका क्लिकवर तुम्ही जगभरातील कोणाशीही जोडल्या जाऊ शकता ,मैत्री करू शकता ह्या जगात काय चाललाय ह्याची माहिती आपल्याला घरी बसून मिळते.बरीच एकटी माणसे आज ह्या सोशल मिडियामुळे रमायला लागली आहेत. हजारो मैलांची अंतरे एका क्लिकवर मिटतात व त्यामुळे कठीण वाटणारी आयुष्याची कोडी अगदी सहज सुटतात! आज सर्वांना एक हक्काचे व्यासपीठ ह्या सोशल मिडियाने मिळवून दिले आहे. त्यामुळे आपण ह्या माध्यमांचा वापर कधी,केव्हा आणि कसा करायचा हे केवळ आपल्याच हातात आहे. माणसं जेव्हा उपाय सोडून अपायांकडे वाटचाल करायला लागतात तेव्हा प्रश्न असतो तो तुमच्या मानसिकतेचा ,मनोवृत्तीचा ,त्यावेळी सकारात्मकतेचा प्रकाश पाडायचा की नकारात्मकतेचा वणवा पेटवयाचा हेही आपल्याच हातात असते. मग हे आभासी जग अपाय किंवा उपाय न राहता ती एक काळाची गरज निर्माण होईल. तेव्हा हे शिवधनुष्य उचलून घेऊनजा आपल्या देशाला प्रगतीपथावर!
--क्रांती करजगीकर- जहागिरदार
आर्यन गार्डन सुडके मळा ,अ नगर
9404636608
: *प्रथम क्रमांक*
1) मूल्यशिक्षण काळाची गरज
"Character is the best ornament in man's life .If wealth is lost nothing is lost. Health is lost something will lost. But character is lost everything will lost."
माणसाच्या अंगी उत्तम चारित्र गुण पाहिजेच.
"जीवनात संपत्ती गमावली तर मनुष्य स्वबळाने पुन्हा मिळवेल. आरोग्य बिघडले तर ते योग्य प्रयत्न करून पुन्हा मिळवता येते. पण उत्तम चारित्र गमावले तर पुन्हा मिळविण्याची वस्तू नाही." सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी म्हंटले आहे .माणसाला पक्षाप्रमाणे आकाशात फिरणे शक्य झाले आहे ,माशाप्रमाणे पाण्यात राहायला शिकला आहे पण माणसाला माणूस म्हणून जगायला शिकता येत नाही. कारण माणसाची नैतिक मूल्यांची घसरण झाली आहे म्हणूनच आज मूल्यशिक्षणाची खरी गरज आहे .सुसंस्कृत जीवनासाठी इष्ट ठरणारी ,मानवी व्यवहाराचे आदर्श जीवनाच्या दृष्टीने नियमन करणारी ही जीवनमूल्ये ,त्यांचे संस्कार शिक्षण म्हणजे नैतिक. शिक्षण मूल्यांचा संस्कार म्हणजे नैतिक शिक्षण .एकविसाव्या शतकामध्ये विलक्षण परिवर्तन झाली आहेत आणि होत आहेत आंतरराष्ट्रीय पातळीवर आधुनिक तंत्रज्ञान ,औद्योगीकरण यांचा नेत्रदीपक विकास झाला बऱ्याच प्रमाणात मानवी जीवन समृद्ध झाले पण त्याच बरोबर असुरक्षितता निर्माण झाली आहे. विकासाच्या प्रवाहाने जात असलेल्या व्यक्तींमध्ये नैतिक मूल्यांचा विकास झाला नाही. मानवाचे जीवन अधिकाधिक असुरक्षित व धोक्याचे येईल अशी जाणीव झाली या जाणिवेतून शालेय शिक्षणामधून नैतिक मूल्यांचे शिक्षण विद्यार्थ्यांना देण्याबाबतचा विचार करण्यात आला .सर्व विकसनशील राष्ट्रांनी नैतिक मूल्यांच्या शिक्षणाच्या बाबतीत एक भूमिका स्वीकारलेली आहे .भारत देश अनेक भ्रष्ट रूढी-परंपरा ,अंधश्रद्धा अशा विविध वाईट अनिष्ट रूढींना पोखरला जात आहे .देशात भ्रष्टाचार निर्माण झाला आहे .समाजात सातत्य आणि स्थर्य समाजातील प्रत्येक नागरिकाचे वर्तन सुसंस्कृत विनयशील असायला पाहिजे. देशावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात हजारो निष्पाप जीवांना मरणाला डोळ्यादेखत सामोरे जावे लागते .याला जबाबदार कोण दहशतवाद ,जातीवादी, मूल्यांची घसरण ?मी तर म्हणेन वैफल्यातून झालेली ही मूल्यांची घसरण आहे .उद्याचा भारत शाळांमधून घडणार आहे शालेय जीवनात विद्यार्थ्यांवर एक व्यक्ती म्हणून कुटुंबाचा ,परिसराचा समाजाचा एक घटक म्हणून आणि या देशाचा भावी नागरिक म्हणून काही संस्कार आवर्जून होणे आवश्यक असते बालवयात मुलांच्या मनावर जे कोरले जाते त्याचा ठसा आयुष्यभर मुलांच्या वागण्यात बोलण्यात व कृतीत वृत्तीत आढळून येत असतो .जे चांगले शाश्वत माणुसकी जपणारे फुलवणारे आहे ते ते मुलांना याच वयात परीचित होणे अगत्याचे असते ओल्या मातीला आकार द्यावा तशी ती रूप घेते आकार घेते .तो आकार देत असताना कुंभार त्याच्या चाकाला विशिष्ट गती देत असतो त्याचे लक्ष त्याला घडविण्यावर केंद्रित झालेले असते म्हणून मुलांना वर्तमानाचे भान व भविष्यकाळाची जाण शिक्षकांना असली पाहिजे शालेय वातावरणात राष्ट्राचे भावी जबाबदार नागरिक घडविण्याची जबाबदारी आपल्याकडे आहे हे काम अध्यापनातून अध्ययन प्रेरणेतून वेगवेगळ्या उपक्रमांतून मुलांना गुंतून सहभागी करून घेऊन करायचे आहे मूल्य शिक्षणाकरिता शाळेच्या वेळापत्रकात स्वतंत्र तासिका असाव्यात असं नाही पण नैतिक शिक्षण हा वस्तुतः अध्यापनाचा स्वतंत्र विषय नाही यासंदर्भात "सद्गुण शिकवता येत नाही "हे सॉक्रेटिसच्या तत्त्वचिंतकाचे असे मत माननीय आहे. "विविध माध्यमांच्या द्वारे संस्करण करून शिक्षणाला शुद्ध चारित्र्याची बैठक नसेल तर त्या शिक्षणाची किंमत शून्य आहे त्या शिक्षणाला सत्य निष्ठेचा व शुद्धतेचा भरभक्कम आधार नसेल तर ते कुचकामी ठरेल आपल्या जीवनातील व्यक्तिगत शुद्धता ,पावित्र्य याकडे तुमचे लक्ष नसेल तर तुमचा नाश होईल तुमच्या पांडित्याला काही किंमत नाही "असे महात्मा गांधी यांचे मत होते .नैतिक जीवन दृष्टि आत्मसात केली जाते म्हणून नैतिक शिक्षण स्वयम् शिक्षण प्रक्रिया आहे शिक्षक मूल्यशिक्षणाचा कार्यक्रम घेण्यास प्रवृत्त होतात मूल्यांची रुजवणूक विद्यार्थ्यांमध्ये करताना शिक्षकाची नैतिकता इतरांपेक्षा उच्चस्तरीय असावी .बागेचा माळी उत्साहित तर बाग प्रफुल्लित दिसते .माळी निरुत्साही असेल तर बाग कोमेजलेली दिसेल. बागेचा टवटवीतपणा माणसाच्या हाती असतो त्याप्रमाणे शिक्षकांमध्ये मूल्य शिक्षणाविषयी आस्थाआणि प्रेरणा निर्माण होणे गरजेचे आहे. दुसऱ्याशी योग्यप्रकारे वागता येते त्याला मदत करणे म्हणजे स्वतःतील स्व विसरून दुसर्याच्या भल्यासाठी त्याग करण्याची प्रेरणा देते ते मूल्यशिक्षण .आदर्श समाजाची निर्मिती व्हावी विद्यार्थीदशेतील संस्कारक्षम वयात त्यांच्यात मूल्ये रुजावित, संस्कारित व्हावीत यासाठी मूल्य शिक्षण ही काळाची गरज आहे.
सौ वंदना विश्वास पाटील
शाळा- काचले बौद्धवाडी ता.महाड जि.राययड
2) द्वितीय क्रमांक*
खरच महिला स्वतंत्र झाल्या का?*
"स्त्री मुक्ती , स्त्री मुक्ती , स्त्री मुक्ती"
स्त्री शक्ती झिंदाबाद ! नारी शक्तीचा विजय असो ! अशा अनेक घोषणानी आसमंत दणाणून गेला होता .मी पण ऊत्सुकतेने व ऊत्साहाने वाह्त्या मोर्च्या कडे पहात होते.
कथा कादंबर्यातून, चित्रपटातून, आई, आजीकडून स्त्रियांचे जीवन त्यांच्यावर होणारा सततचा अन्याय त्यांचे दबलेपण
त्यांचे शोषण या सर्व गोष्टी नजरे समोर येत गेल्या फार पूर्वीच्या काळापासून गार्गी मैत्रयी सारख्या स्त्रियांचे वेद शिक्षण ही फार मोठी जमेची बाजू वगळता, मधल्या काळात स्त्रीच्या उन्नतीबाबतचा इतिहास लुप्त आहे अथवा फारसा प्रसिध्द नाही.
वास्तविकपणे स्त्रीला देवता मानून तिचे पूजन करणारी आपली आपली संस्कृती , परंतू स्त्रीच्या शक्तीचा तिच्या वैविध्यपूर्ण क्षमतांची चुणूक व दाखले तत्कालिक समाजाच्या ध्यान्यात आल्यानंतर ' स्त्री ' हि जमात आपल्या पुढे कायमची जाऊ शकते हे ध्यानात आल्यावर तिच्याच स्रुजनक्षमतेला शक्ती न मानता तिची ' भोगदासी ' करण्यात आली.इतकेच नव्हे तर वेगवेगळ्या संस्कृतीक व्रत वैकल्यांच्या नावाखाली तिची गळचेपी करण्यात आली.
सर्व प्रकारची कर्मकांडाचीच नव्हे तर पेहेरावापासूनची सर्व बंधने तिच्यावर लादण्यात आली. आणी चुल व मूल, संस्कृती रक्षण इत्यादी गोष्टी करण्यातच तिच्या जीवनाची धन्यता आहे.याची जाणीव तीला रहाण्यासाठी पुरुष प्रधान संस्कृती - जुलुमशाही निर्माण झाली.जी जुलुमशाही फक्त शारीरिकच नव्हे तर सर्वार्थाने स्त्रिचे मानसिक, सामाजिक व आर्थिक ही शोषण करू लागली.
महिल्यांच्या मनाची जडणघडण वर्षानुवर्ष अशीच करत गेल्यामुळे अथवा होत गेल्यामुळे सर्व प्रथम ' माणुस ' म्हणून जगण्याचा त्यांचा "हक्क "हीच गोष्ट त्याच्या ध्यानातही नव्हती आणी आजही फारच अभावाने द्रुष्टीत्पत्तीस येते.
स्त्री शिक्षणाचा पाया रचणार्या सावित्रीबाई फुले ह्या केवळ त्यांच्या पतीने त्यांच्यात
' स्त्री शिक्षणाचे ' महत्व रुजवल्यामुळे व पतीचा पाठींबा असल्यामुळे त्यांच्या सारख्या त्यांच्या असंख्य लेकी त्या घडवु शकल्या हे जरी खरे असले तरी शिक्षण वगळता इतर कोणत्याही बाबतीत त्या स्त्रियांना मुक्तता अथवा स्वातंत्र्य देऊ शकल्या नाहीत .
ही त्यांच्या कार्यातील त्रुटी नसून एकुण समाज व्यवस्थेचे द्योतक आहे.आजही भारतीय संस्कृती मधील स्त्री, खऱ्या अर्थाने मुक्त नाही.नवऱ्यापासुन फारकत घेणे म्हणजे मुक्तता नाही.काही स्त्रियांच्या बाबतीत ते अंशतः खरे ही असेल, पण तरीही समाजाच्या, घरनच्यांच्या, अपेक्षा व नजरेतून त्या कधीच मुक्त नसतात.
आनंदाने स्वताच्या संसारात रमलेल्या बऱ्याचशा महिला मन मारुन रुढी म्हणून रुढी तोडायची हिंमत नाही म्हणून अथवा कर्तव्य म्हणून कुटुंब व्यवस्थेत पडलेल्या दिसतात .प्रत्येक सणासुदिला स्वताहाचे रोजचे व्याप , नोकरी , व्यवसाय सांभाळून साजरे करताना मुलांसाठी , पतीसाठी , सन्मानासाठी अक्षरशः तारेवरची कसरत करत कधी घरी तर कधी बाहेरून पदार्थ विकत आणुन ती स्वतःच्या मनाचे व समाजाचेही समाधान करते.
ऑफ़िस मध्ये ही , अगदी शाळा - कॉलेज मध्ये शिक्षक म्हणून नोकरी करतांना , स्वतःच्या रोजच्या कामाचा गाड़ा ओढताना लैंगिक शोषणाला तीला बळी पडावे लागते .घरामधून काळाप्रमाणे बदलण्यासाठी केलेल्या कामाच्या वाटण्या अथवा सोयी ह्या नवऱ्यासकट इतर नात्यामधून मान्य न केले जाण्याचा वाटा जास्त असतो. मुलांच्या संगोपनासाठिही महिलांनाच जवाबदार धरले जाते.
आणी स्वतःच्या करीअरला दुय्यम स्थान देत स्त्री ह्या गोष्टी करते तेंव्हा तिच्यावर ही बंधने लादण्यासाठी बऱ्याचदा अन्य स्त्रिया तिच्यावर वेगवेगळ्या मार्गानी दबाव टाकत असतात .
ह्या सर्वावर विजय मिळवण्यासाठी इतर पातळ्यांवर संघर्ष करावा लागतो म्हणजे स्त्री अजुन स्वतंत्र नाही .म्हणून आजही फक्त स्वतःचा विचार एक माणुस म्हणून एक व्यक्ति म्हणून करू शकत नाही ती प्रथम कुटुंबाचाच आधी विचार करते. .म्हणूनच स्त्री खऱ्या अर्थाने स्वतंत्र नाही.
आपले नाव:- सौ सुषमा सुनील सहस्रबुद्धे .
पत्ता :-ठाणे , डोंबीवली .
मो.नं. :-770910850
3)*तृतीय क्रमांक*
लेक वाचवा लेक शिकवा
आज विसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर असतांनाा 'लेक वाचवा लेक शिकवा 'हे अभियान राबवावे लागते ही आपली शोकांतिका म्हणावी लागेल.ज्या भारत देशाच्या संस्कृतीला महान संस्कृती म्हणून जगात ओळखले जाते त्या देशात लेक वाचवा लेक शिकवा म्हणण्याची वेळ आली. अशिक्षित कुटुंबातच नाही तर सुशिक्षित व उच्चशिक्षित लोक देखील एखाद्या कळीला गर्भातच खुडून टाकण्यात मागे नसतात त्या आईचा विरोध असला तरी, कधी पतीच्या ,तर कधी घरातील इतरांच्या विरोधापुढे तिचा विरोध बोथट ठरतो.
याचाचा परिणाम आज देशातील स्त्रियांचा पुरुषांच्या तुलनेत घसरलेला जन्मदर.वर्तमान पत्र उघडले की,स्रीयांवर होणारे अत्याचार हुंडाबळी, छेडछाड अशा बातम्या वाचून मन खिन्न होते ,परंतु ऐकूण आणि वाचून गप्प राहिलो तर समाजात भयानक परिस्थिती राहील. 'मुलगा म्हणजे वंशाचा दिवा मुलगी म्हणजे परक्याचे धन' ही भावना मनातून काढून टाकली पाहिजे. 'मुलगा मुलगी एक समान दोघांनाही शिकवू छान हा विचार प्रत्येक स्री-पुरुषाच्या मनात रुजला पाहिजे .याशिवाय अगदी सुरुवातीपासूनच समानतेचे धडे गिरवले जायला हवे तरच स्त्रीला दुय्यम लेखण्याची पारंपरिक मानसिकता बदलण्याच्या दिशेने सुरुवात होईल.
मुलगी जर स्वतःखंबीर असेल, स्वतःच्या पायावर उभी असेल, तर तिचाही वडीलांना म्हातारपणी आधार देऊ शकते. त्यासाठी मुलगा हवा अशी आवशकता नाही. समाजातील विघातक परिस्थिती बदलायची असेल तर मुलांप्रमाणे मुलींनाही शिक्षण देऊन त्यांना सक्षम करण्याची आवश्यकता आहे.
पालकांनी मुलींच्या आहाराकडे लक्ष द्यायला हवे. मुलींना व्यायामाचे महत्व पटवून दिले पाहिजे. झाशीची राणी लक्ष्मीबाई व्यायाम करायच्या दंड बैठका कढायच्या . हा इतिहास समोर ठेवला पाहिजे .मुलींना स्वरक्षणासाठी कराटे शिकवले पाहिजे त्यामुळे मुलगी अन्याय व अत्यचाराचा प्रतिकार करू शकेल.
स्रीभ्रूण हत्या थांबवण्यासाठीचे कायदे फक्त कागदावरच न राहता त्यांची अंमल बजावणी होणे महत्वाचे आहे. स्त्री भ्रूण हत्या होऊ नये यासाठी समाज प्रबोधन होणे गरजेचे आहे .व्यक्ती आणि समाज या दोघांसाठी शिक्षण हे कमालीचं महत्त्वाचं असतं. वैयक्तिक, सामाजिक, आणि राष्ट्रीय विकासाचा मार्ग शिक्षणातून जातो. शिक्षण ही प्रगतीसाठी गुरुकिल्ली आहे. समाजात बदल घडवायचे असतील तर मुलींना शिक्षण द्यायला हवे.
"मुलींना मानू नका आयुष्याचे ओझे
आनंदाची रुणझुन तिच्या पैजणा तून वाजे.
खेडो-पाड्यातुन, शहरातून, शाळा कॉलेज ,महिला मंडळातून, प्रसारमाध्यमातून, मुलीच्या जन्माचे स्वागत होणे तसेच, प्रबोधन होणे गरजेचे आहे. सरकारतर्फे मुलीला जन्म देणाऱ्या पालकांचा सत्कार करून, त्यांना एखाद्या नव्या योजनेचा लाभ मिळायला हवा आणि मुलींना त्यांच्या भविष्यासाठी आर्थिक तरतूद व शैक्षणिक सुविधा मिळाल्या तर मुलीचा जन्म आनंदात होईल. इंदिरा गांधी, प्रतिभाताई पाटील, लता मंगेशकर, कल्पना चावला, सायना नेहवाल, पी.टी उषा ,किरण बेदी, अशा या महान व्यक्तींचा आदर्श समोर ठेवून मुलींना शिक्षण द्यायला हवे. सावित्रीबाई फुले यांनी तर समाज प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला मार्गक्रमण करून स्त्री शिक्षणाचा वसा त्यांनी हाती घेतला. तसेच आजच्या स्त्री भ्रूण हत्या थांबविण्यासाठी सुशिक्षित स्त्रियांनी पुढे यायला हवे.
आपल्या मुलीला फक्त तीच वाचवू शकते,कारण ती तिच्या पोटात वाढते.ती तयार नसेल तर स्री भ्रूण हत्या होणार नाहीत त्यासाठी गरज आहे ती वैयक्तिक व सामाजिक सक्षमीकणाची
'स्री जन्म म्हणूनी न राहावे कोणी उदास
स्रीच करते देशाच्या उद्धारसाठी प्रयास.
लेखिका
श्रीमती वर्षा बापूराव देशमुख
जि.प.के.प्रा.शा.दावरवाडी
ता.पैठण जि.औरंगाबाद
मोबाईल नं 7030154316
4)*लक्षवेधी क्रमांक 1*
सोशल मिडिया फायदे-
तोटे
सोशल मीडिया आहे
खजिना ज्ञानाचा ।।
वापरा तो होईल फायद्याचा ।।
मनोरंजन ,ज्ञान, माहितीचा साठा
उतुंग भरारी त्यासोबत गाठा ।।
खऱ्या अर्थाने आजचे युग हे सोशल मीडियाचे युग आहे. कारण सोशल मीडियाचा वापर प्रत्येक ठिकाणी, प्रत्येकजण करताना दिसतात . विशेषतः तरुणवर्ग यामध्ये आघाडीवर आहे .
व्हॉट्स अँप , यु-ट्युब , फेसबुक, इन्ट्राग्राम, ट्विटर, हाईकमेसेंजर इत्यादी अनेक प्रकारच्या सोशल मीडियाचा वापत सर्रास तरुणवर्ग करत आहे.सोशल मीडियाचे अनेक फायदे आहेत. जसे व्हॉट्स अँपद्वारे आपण आपल्या दूरच्या मित्र-मैत्रिणींना किंवा नातेवाईकांशी संपर्कात राहू शकतो. सोशल मीडिया हा इतर सर्व मिडियापेक्षा वेगळा आहे. प्रिंट मीडिया, इलेकट्रोनिकमीडिया, समांतर मिडिया यांपेक्षा सोशलमिडिया वेगळा आहे .
सोशल मिडियाद्वारे जगभरात घडणाऱ्या घटनांचे ज्ञान आपणाला क्षणार्धात मिळते. याद्वारे मनोरंजनही होते, माहितीची देवाणघेवाण होते. आपले ज्ञान अद्यावत राहते . सोशल मीडिया हे एक विशाल नेटवर्क आहे जे जगभरात पोहोचले आहे .ट्विटर, यु-ट्युब फेसबुक व्हाट्स अँप याद्वारे आपण आपले मेसेज इतरांना पोहचवू शकतो .अगदी कमी वेळत्या गोष्टी होतात . जगातल्या कोणत्याही कानाकोपऱ्यात या गोष्टी आवण पाठवू शकतो.फोटो, फिल्म, टेलिफिल्म, व्हिडीओ यांद्वारे आपण आपले मेसेज पाठवू शकतो.
सोशल मेडियाद्वारे आपण आपली कामे करू शकतो. त्यामुळे आपला वेळ वाचतो . अनेक ऑनलाईन मित्र-मैत्रिणी आपल्याला मिळतात. अनेकांची, ऑनलाईन ओळखीतून लग्न होतात. नातेसंबंध जुळतात. अनेकवर्षं दूर असणाऱ्या बालमैत्रिणी संपर्कात येतात
एखादा असाध्य रोग असेल त्यावर उपाय शोधताना डॉक्टरही सोशल मीडिया चा वापर करून
पण आजची तरुण पिढी केवळ व्हॉट्सअप्पवर मेसेज सेंड करण्यात, ते वाचण्यात गुंतलेली दिसते . यामुळे त्यांचा वेळ वाया जातोच. आणि ज्ञानात काहीच भर पडत नाही . केवळ त्यांचे हात बटणे दाबण्याचा काम करते . आणि डोळे स्किन पाहण्याचे काम करते .त्यामुळे मेंदू डोळे , हाताचे स्नायू यांवर विपरीत परिणाम होऊन अनेक रोगांना सामोरे जावे लागते. अनेक मानसिक आजारांना सामोरे जावे लागते
खोटे मेसेज टाईप करून पाठवणे किंवा मेसेजमध्ये बदल करून पाठविणे . यांसारख्या गोष्टी केल्या जातात त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम, भीती निर्माण होते. संपूर्ण समाज , तरुण पिढी त्यामुळे बरबादीजडे जाताना दिसते. त्याचमुळे दंगली घडताना दिसतात. समाजाचे विद्रुपीकरण करण्याचे काम सोशल मीडियाचा
वापर केले जाते.
प्रत्येकजण विशेषतः तरुण पिढी मोबाईल, कॉम्पुटरला चिकटलेली दिसते नातेवाईकांच्या जवळ असून दूर गेलेली दिसतात. एकाच छताखाली प्रेम - जिव्हाळा
राहत नाही. नात्यात यांत्रिकता आलेली दिसते.
सोशल मीडिया ऑनलाईन मित्र- मैत्रिणी भेटतात , प्रेमाची नाटके केली जातात. मुलींचा गैरवापर केला जातो.बँकबलन्स लंपास केले जाते. घरफोड्या केल्या जातात.
अनेक लहान मुले , किशोरवयीन मुले, तरूण मुले या गेमचे ऍडिक्ट झालेले दिसतात. गेम खेलताना घरदार, खाणेपिणे, अभ्यास सारे विसरले जाते . ब्लु व्हेल सारसखा गेम अनेकांचे प्राण घेतो . एवढे एखाद्या गोष्टीतआहारी जाणे घातकी आहे.आयुष्य एवढे किमती आहे .ते क्षणात संपविणे चुकीचे
याच सोशाल मिडियामुळे अनेकांचे संसार मोडले. म्हणून अतिरेक करू नका "अति तेथे माती होते " . अतिरेकामुळे विपरीत परिणामाना सामोरे जावे लागते
लोकहो सावधान सोशल मीडियाचा वापर योग्य तेथे योग्य प्रमाणात करा
"सोशल मीडियामुळे मिळते ज्ञान
योग्य वापराने होईल फायदा छान
संमजदारीने वागा राहील आनबा नशान ।।
जगी मिळेल तुम्हा अफाट मानपान ।।
सौ मनिषा आकाश पावनारकर
महाड-
5) लक्षवेधी क्रमांक 2
माहिती तंत्रज्ञानाचा अध्यापनात वापर
अध्ययन अध्यापनात तंत्रज्ञानाचा वापर म्हणजेच ' वैज्ञानिक व इतर सुसंघटीत ज्ञानाचे ' अधिक गुणवत्ता पुर्ण आणि परिणामकारक शिक्षण प्रणाली उत्क्रांत करण्यासाठीचे उपयोजन.
जगातील संशोधनाचे निष्कर्ष हेच दर्शवितात की फक्त तंत्रज्ञानावर आधारीत शिक्षण प्रणालीतच , कमीत कमी किमतीत शिक्षणाची उच्च गुणवत्ता आणि जास्तीत जास्त उपलब्धता , एकाच वेळेस देणे शक्य आहे .
आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराने अध्ययन अध्यापन रंजक तर होईलच पण स्वयंअध्ययनाची सवय लागेल . पारंपारिक शिक्षणव्यवस्थेत शिक्षक शिकवीत असलेल्या स्थळी आणि वेळीच विद्यार्थाने उपस्थित असणे आवश्यक असते .परंतु तंत्रज्ञानाच्या वापराने स्थळ काळाची ही बंधने गळून पडतात . तंत्रज्ञानाच्या वापरामुळे प्रत्येक विद्यार्थी, त्याला सोयीच्या ठिकाणी आणि सोयीच्या वेळी शिकु शकतो . आतापर्यंत शिकु शकत नसलेल्या खूप मोठया विद्यार्थी संख्येस शिक्षणव्यवस्थेत आणण्यास तंत्रज्ञानामुळे शक्य होते . तंत्रज्ञानामुळे शिक्षणाच्या उपलब्धतेत भरपूर वाढ होते .
तंत्रज्ञानामुळे शै . साहित्य प्रकाशीत केल्यानंतर लगेच जगातील सर्व विद्यार्थी त्याचा वापर सुरू करू शकतात . तंत्रज्ञानामुळे विद्यार्थी तिप्पट वेगात शिकतात . जगातील सर्व विद्यार्थी कोठूनही आणि केव्हाही शिकू शकतात .विद्यार्थ्याच्या आवडीनिवडी किंवा पुर्ण क्षमतेनुसार शिक्षण साहित्याच्या सादरीकरणात अनुरूप बदल करण्याची क्षमता तंत्रज्ञानात असते .
अध्ययन अध्यापनात तंत्रज्ञानाच्या वापराने Evaluation and Feedback ह्या सारख्या महत्वाच्या शै. कृती संगणकाच्या साहाय्याने , प्रत्यक्ष शिक्षकाच्या सहभागाशिवाय वारंवार करणे सहज शक्य आहे .Exploratory Learning पध्दतीचा प्रामुख्याने वiपर होत असल्याने शिक्षण प्रक्रिया विद्यार्थ्यासाठी
आनंदायी व् सहज होते . आनंददायी सहज शिक्षणामुळे विद्यार्थ्याची अभ्यासात रुची वाढते. त्यामुळे शिक्षक Interaction वर जास्त वेळ देऊन " मानवी शिक्षकाच्या या अत्यावश्यक कर्तव्याला " न्याय देऊ शकतात . प्रत्येक विषयाचे ज्ञान शिक्षकास असणे काळाची गरज असते . कारण ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणाऱ्या शिक्षकांचा ज्ञानाचा झरा हा वाहता असावा . कोरडया झऱ्याकडून कोणीच तहान भागवण्याची अपेक्षा करीत नाही . म्हणून अध्ययन अध्यापनात शिक्षक व विद्यार्थी या दोन्ही घटकासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग होणे गरजेचे आहे असे मला वाटते .
लेखिका : श्रीम . स्वाती शिंदे
जि.प . प्रा . शा . वत्सलानगर अणदूर ता . तुळजापूर जि . उस्मानाबाद
6) लक्षवेधी क्रमांक 3
घे उंच भरारी.
विधात्याने या सृष्टीची निर्मिती केली त्यावेळी या सृष्टीला सृजनशील बनवणारी ,भविष्याला ओटीत फुलवणारी आणि गत काळाला पदरात झुलवणारी स्त्री त्यानं निर्माण केली. काळ पुढे जात गेला आणि स्त्रीवरील बंधने वाढत गेली. तरीही, स्त्रीने जुलूमचा पिंजरा तोडून आपल्या आशा, आकांक्षाचे पंख फडकून तिने आपला विकास घडववण्याचा प्रयत्न केला, आलेल्या अडथळ्यांवर मात करून उंच भरारी तिने घेतली.
घे उंच भरारी ह्यावर विचार करत असताना सर्व प्रथम आजच्या स्त्रीची नेमकी व्याख्या काय आहे हे सांगणे गरजेचे वाटते.अनेक रूपांमध्ये ती आपल्याला दिसून येतेच पण त्याच बरोबर निवडलेल्या क्षेत्राशी बांधिलकी घट्ट करणारी , सामाजिक आणि कौटुंबिक जीवनात समतोल राखणारी ,प्रत्येक नातं निभावणारी आणि गरज पडताव्ह दुर्गेचे रूप धारण करणारी आहे आजची स्त्री! ही स्त्री तेव्हाच उंच भरारी घेऊ शकते जेव्हा तिच्या समोरच्या प्रश्नांना , आव्हानांना सामोरे जाऊन त्यावर मात केली जाईल. आजच्या स्त्रीला या तिच्यावर होणाऱ्या अन्यायाची जाणीव आहे, त्याबद्दल ती धीटपणे बोलते, त्याविरुद्ध ती लढते पण तरीही समाजात इतकी अस्थिरता का आहे ! आज सतीबळीची जागा हुंदबळीने , बालिका हत्येची जागा गर्भजल परीक्षेने , बालविवाहाची जागा विनयभंगाने घेतली आहे. काळानुसार स्त्रीप्रश्नांचे केवळ मुखवटे बदलत गेले , स्त्रीचा छळ सुरूच राहिला.ह्यावर मात करून स्त्रीला जर उंच भरारी घ्यायची असेल तर ह्या प्रश्नांच्या मुळाशी जाणे महत्वाचे आहे. त्यातील पाहिले म्हणजे ,कायदे - स्रीगुन्ह्यांविरुद्ध असणारे कायदे तितके सक्षम नाहीत त्यामुळे स्त्री सक्षमीकरण होत नाही. याची मुख्य करणे म्हणजे, कायदे स्त्रीहिताचे असले तरीही ते राबविणाऱ्या यंत्रणा पुरुषहिताच्याच आहेत दुसरं म्हणजे कायदे कितीही केले तरी स्त्रियांबद्दल पुरुष विचारसरणीत बदल घडवून आणण्यात काहीच योजना केल्या जात नाहीत आणि तिसरं म्हणजे गुन्हा घडून गेल्यावर वर्षाने गुन्हेगाराला शिक्षा झाल्यामुळे त्याची तीव्रता कमी होते.
दुसरे म्हणजे , स्वावलंबन आणि सक्षमीकरण - स्वावलंबन हा नैसर्गिक अधिकर आहे. स्त्रीचे आर्थिक , शैक्षणिक , सामाजिक स्वावलंबन होणे अत्यंत गरजेचे आहे. आज आपल्याला भरारी साठी नवरा आंधळा म्हणून स्वतःच्या डोळ्यावर पट्टी बांधून घेणारी गांधारी नाही पाहिजे तर पतीच्या आंधळेपणावर स्वतःच्या डोळ्याची दृष्टी देऊन कुटुंबाचा विकास करणारी ,आधुनिकतेकडे नेणारी समाज सक्षम करणारी आधुनिक गांधारी अभिप्रेत आहे. आपण एक स्त्री आहोत आणि म्हणून आपले समाजातील स्थान दुय्यम आहे ही भावना कुठल्याच स्त्रीच्या मनात जेव्हा राहणार नाही त्याचवेळी स्त्री सक्षम होईल आणि उंच भरारी घेईल. विज्ञानाची कास धरणारी, अंधश्रद्धा दूर करणारी स्त्री सक्षम आहे. केवळ वरवरचे सौंदर्य नाही तर मनाचे सौंदर्य महत्वाचे आहे हे मानणारी स्त्री सक्षम आणि उंच भरारी घेणारी स्त्री असेल. पुरुषांची बरोबरी करताना पुरुषप्रधान संस्कृतीत आपण आपले स्त्रीत्व न हरवता संवेदनशीलपणे न्यूनगंड न ठेवता वागणारी स्त्री उंच भरारी घेऊ शकणार आहे. समाजाची वाटचाल पुरुषप्रधान संस्कृतीकडून स्त्रीप्रधान नव्हे तर समानता असणाऱ्या संस्कृतीकडे नेणारी स्त्री उंच भरारी घेऊ शकते. मदर तेरेसा , इंदिरा गांधी, कल्पना चावला होऊन, 'न भूतो ,न भविष्यती' अशी नव्या युगाची यगंधरा होऊन उंच भरारी ती घेईल , फक्त तिला देवी म्हणून पूजु नका आणि दासी म्हणून भाजू नका माणूस म्हणून वागवा कारण ... माणसाने माणसाशी माणसासम वागणे!
क्रांती करजगीकर/ जहागिरदार.
आर्यन गार्डन, सुडके मळा, अहमदनगर.

इतर देशातील तंत्रज्ञानाचा उपयोग करू शकतात. त्यामुळे रोग्यावर योग्य उपचार करणे सहज शक्य होत.असे एक अनेक चांगले फायदे आपणाला या सोशल मीडियाचे आहेत. मात्र याचा वापर प्रमाणात करणे आवश्यक आहे.

No comments:
Post a Comment