WELCOME

onlyactiveteachers.blogspot.in राज्यस्तर उपक्रमशील शिक्षिका समूहाच्या वेबसाइटवर आपले सहर्ष स्वागत
animated-welcome-image-0114

खुले रंगमंच

खुल्या रंगमंचावर आपणा सर्वांचे स्वागत
आपल्याकडे स्वतःचे काही लिखित साहित्य असतील तर तुमच्या नावाने माझ्या ब्लॉगवर प्रसिद्ध केले जाईल



🌹परिपाठ सूत्रसंचालन🌹

 "संस्कार शाळा आहे ज्ञानाची लाट
इथेच मिळते यशाच्या शिखराची वाट,
       अशा या सुंदर शाळेत नेहमी सादर होतो परिपाठ.

    म्हणून आज आम्ही इयत्ता......वी मुले/मुली परिपाठ सादर करणार आहोत तरी तुम्ही आमचा परिपाठ शांत चित्तेने एकून घ्यावा हि नम्र विनंती.

१)सुविचार:-कासवाच्या गतीने का होईना रोज थोडी थोडी प्रगती करा.वाटेत खूप ससे आडवे येतील बस त्यांना हरवायची हिम्मत ठेवा.आणि जर तुमची श्रीमंती तुम्हाला मोजायची असेल तर नोटा मोजू नका चुकून कधी डोळ्यातून दोन अश्रू आले तर ते पुसायला कितीजण येतात ते मोजा म्हणून कासवाच्या गतीनं का होईना थोडी थोडी प्रगती करा आणि प्रगती करण्यासाठी आपल्याकडं चांगले व सुंदर आचार विचार असणे गरजेचे आहे.म्हणून आजचा चांगला विचार म्हणजे सुविचार सांगण्यासाठी येत आहे......

२)दिनविशेष:-नवीन दिवस नव्या उम्मेदी जरा शोधूया.नवीन वाटा प्रकाशाकडे वाटचाल अन अंधाराच्या थोपवू लाटा.खरच येणारा दिवस कालच्या पेक्षा अधिक आनंदाने,उत्साहाने आणि चांगल्या दृष्टीकोण जगायचा असतो आजचा दिवस हि असाच आहे.म्हणून आजच्या दिवसाचे महत्व दिनविशेषातून सांगण्यासाठी दिनविशेष घेऊन येत आहे......

३)बातम्या:-मित्रहो असा प्रश्न पडत नाही का? कि बातम्यांना इंग्रजीमध्ये NEW,S असे का म्हणतात? कारण N-म्हणजे नॉर्थ,E-म्हणजे ईस्ट,W-म्हणजे वेस्ट व S-म्हणजे साऊथ अशा जगातील चार दिशातील कानाकोपऱ्यातील घडामोडी आपल्याला कळतात म्हणून त्याला NEW,S असे म्हणतात. म्हणून आजचे न्युज म्हणजे बातमीपत्र घेऊन येत आहे........

४)बोधकथा:-खूप काही शिकून जाते जाता जाता म्हणून रोज ऐकायची असते एक छोटीशी बोधकथा म्हणून आजची बोध कथा सांगण्यासाठी येत आहे......


५) प्रश्न:-  प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा असेच का अन तसेच का शिकणे कधी संपत नाही होऊ दे लाख चूका खरंच माणूस हा आयुष्यभर विद्यार्थीच असतो.अन आयुष्यभर विद्यार्थी म्हटल्यावर प्रश्न हे पडणारच तसेच आम्हाला हि काही प्रश्न पडले आहेत बघूया तुम्हाला त्याची उत्तरे येतात का?म्हणून आजचे प्रश्न घेऊन येत आहे......

६)कोडे:- छोट्या या आयुष्यात खूप काही हवं असतं पण पाहिजे तेच मिळत नसत.असंख्य चांदण्यांनी भरूनही आपलं आभाळ मात्र रिकामं असतं.हव्या असलेल्या सगळ्याच गोष्टी माणसाला मिळत नसतात.पण नमिळणाऱ्या गोष्टीच का माणसाला हव्या असतात?म्हणून म्हणतात जीवन एक खेळ नव्हे,फुकट मिळालेला वेळ नव्हे जीवन एक कोडे आहे.सोडवला तितके थोडे आहे.म्हणून जीवनासारखे एक मजेदार कोडे घेऊन येत आहे.....

७)इंग्रजी संवाद:- इंग्रजी भाषा हि आंतरराष्ट्रीय भाषा आहे.त्याचा पाया मजबूत होण्यासाठी शब्दार्था बरोबर छोटे छोटे संवाद येणे गरजेचे आहे म्हणून आजचा इंग्रजी संवाद घेऊन येत आहे.......

शेवटी जात जात एवढंच म्हणेन

"किती क्षणाच हे आयुष्य असतं 
आज असतं तर उद्या नसतं
म्हणून ते हसत हसत जगायचं असतं .कारण येणारे दिवस येत असतात, जाणारे दिवस जात असतात,येणाऱ्यांना घडवायच असतं, जाणाऱ्यांना जपायच असतं
अन आयुष्याच गणित सोडवायच असतं, म्हणूनच कधीतरी कोणासाठी तरी जगायच असतं"

   🌹🌹संकलन🌹🌹
🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤
     राजेंद्र भाऊराव देशमुख
संस्कार वि.मं. शिये,कोल्हापूर
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻








📙📚 *गाणे मुळाक्षरांचे*📚📙
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
कमळातील क पाण्यातच राहिला
ख चा खटारा आम्ही नाही पाहिला
      ग च्या गळ्यात घालायची माळ
      घ च्या घरात रांगते बाळ
च च्या चमच्यामध्ये औषध हे घेऊ
छ ची छत्री घेऊन पावसात जाऊ
      ज च्या जहाजात बसू कधीतरी
     झ च्या झबल्यात दिसेल न मी परी
ट चे टरबूज गोल गोल फिरते
ठ च्या ठशामध्ये शाई कोन भरते
     ड चा डमरू वाजे किती छान
     ढ चे ढग वाटे कापसाचे रान
न च्या नळावर पाणी पिऊ चला
ण चा बाण कसा आभालात गेला
    त च्या हातामध्ये मोठी तलवार
    थ चा मोठा थवा जाई दूर फार
द च्या दरवाजात आहे कोण उभा
ध च्या धरणात पाणी किती बघा
     प चा पतंग ऊंच ऊंच फिरे
     फ च्या फणसात गोड गोड गरे
ब च्या बगळ्याची ऊंच ऊंच मान
भ चे भडंग लागते छान
      म म मगर ही पाण्यातच राही
      य यमक कवितेत येई
र च्या रथाला चार चार घोडे
ल चे लसून भाजीत टाकू थोडे
      व च्या वजनाचे आकारच वेगळे
       श चे शहाम्रुग मोठे मोठे बगळे
ष च्या षटकोनाला बाजू कोन सहा
स च्या सशाचे मोठे कान पहा
       ह चे हरिण चाले तुरू तुरू
      ळ च्या बाळाला नका कोणी मारू
क्ष चा क्षत्रिय पराक्रमी वीर
ज्ञ चे ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर 
       पाठांतर सोपे झाले मुळाक्षरांचे
       चला रे गाऊ या हे गाणे अक्षरांचे
📚📚📚📚📚📚📚📚📚








खूप छान कविता  वाचायला मिळाली.
कवि चे नाव माहीत नाही. 
आहे तशीच पोस्ट करतेय :- 

*भूतकाळात डोकावल्या शिवाय*
*मजा काही मिळत नाही*
*मागे वळून पाहिल्यावर*
*हसावं का रडावं कळत नाही*

*साऱ्याच गोष्टी मध्ये*
*खूप खूप बदल झाले*
*पहिल्या पेक्षा प्रत्येकाला*
*नक्कीच बरे दिवस आले*

*खरं वाटणार नाही पण*
*एवढं सगळं बदललं*
*निगरगट्ट माणूस सुद्धा*
*मुळा सकट हादरलं*

*शाळेतून घरी गेल्या गेल्या*
*दप्तर कोनाड्यात जायचं*
*दुसऱ्या दिवशी शाळेत जाताना*
*बाहेर काढल जायचं*

*अहो दप्तर म्हणजे काय*
*वायरची पिशवी असायची*
*जुन्या फाटक्या पुस्तका सोबत*
*फुटकी पाटी दिसायची*

*अभ्यास कर म्हणून कुणी*
*म्हणलंही नाही*
*अन मार्क कमी पडले म्हणून*
*हाणलंही नाही*

*कोणताही ऋतू असो*
*काळपट चहा असायचा*👌
*तडकलेल्या बशीवर*
*कानतुटका कप दिसायचा*

*बारा महिने अनवाणी पाय*
*चप्पल म्हणजे श्रीमंती* 
*पायाला चटके बसायचे*
*पण सगळ्या गावात हिंडायचे*

*कुणाचं गुऱ्हाळ लागलं की*
*चला रस प्यायला*
*खळे दळे लागले की* 
*चालले शेतात झोपायला*

*मरणाची गरिबी होती*
*पण मजा मात्र खूप*
*लग्ना कार्यात माणसं , नाती*
*व्हायची एकरूप*

*अमावस्येच्या दिवशी पोरं*
*मारुतीच्या पारावर* 
*नारळाच्या टूकड्यासाठी*
*एकमेकाच्या अंगावर*

*ओ मामा द्या नं , ओ मामा द्या नं*
*एकच गलका व्हायचा*
*रेटा रेटी  केल्यामुळं*
*सदरा टरकून जायचा*

*पाहुण्याला पाहुणचार म्हणून*
*खिचडी भजे व्हायचे*
*तेवढ्यातच सारयांचे*
*डोळे भरून यायचे*

*तेलच्या-गुळवणी आणि पापडांची*
*काय मामलात होती*
*तरीही त्या माणसां मधे*
*माणुसकी होती*

*रात्र रात्र गप्पा व्हायच्या*
*डोळ्यात यायचं पाणी*
*आडपडदा न ठेवता*
*दुःखाची व्हायची गाणी*

*कुठे गेला तो साधेपणा*
*कुठे गेलं ते सुख  ?*
*खरं सांगा पहिल्या सारखी*
*लागते का आता भूक ?*

*इतकुसाक पेढ्याचा तुकडा*
*मिडकू मिडकू खायचा*
*कधी तरी कुणी तरी*
*प्रसाद म्हणून द्यायचा*

*सारं सारं संपून गेलं*
*आता पैसा बोलत असतो*
*माणूस मात्र भ्रमिष्टा सारखा*
*खोटं खोटं डोलत असतो*

*पेढ्याच्या बाॅक्स कडे*
*ढुंकूनही कुणी पहात नाही* 
*एवढंच काय पहिल्या सारख्या*
*मुंग्याही लागत नाही*

*सुखाचं बोट कधी सुटलं* 
*आपल्या लक्षात आलं नाही*
*श्रीमंतीत सुख मिळेल वाटलं*
*तसं काही झालं नाहीे*
 *ते सुख आणि वैभव*
*पुन्हा घरात येईल का ?*
*चिरेबंदी वाड्या मधून*
*हसण्याचा आवाज येईल का?*







🌺शब्दविद्या आयोजित स्पर्धेसाठी🌺

🌺आई🌺

आई तू ईश्वराचे रूप.
आई तू सूंदर अन् सुस्वरूप.||1||

आई तूझी वेडी माया.
मिळेना  मला तूझी छाया.||2||

आई तूझी मधूर वाणी.
जीवनगाथा तूझी करूणेच्या वेदनेची कहाणी.||3||

आई तूझे थोर संस्कार.
आई तू मांगल्याची शिल्पकार.||4||

आई तूझे रूप गुणवान.
आई तू सौंदर्याची  खाण.||5||

आई तूझा पदर मऊ रेशमी.
आई तूझ्या मायेची उब कुठे शोधू मी.||6||

आई तूझे कष्ट अन वेदना अपार.
का सोसवला नाही ,या संसाराचा भार.||7||
आई तूझी अंगाई येईना गं कानी.
येईना झोप का गेलीस लेकराला सोडूनी.
||8||

भाग्य माझे थोर,तुझ्या कुशीत जन्म लाभला.
कुठे कुठे शोधू मी सांग तूजला.||9||

सांजवेळी सांजवात देवापुढे लावते.
प्रीतीची फूलवात लावूनी तूलाच देवाकडे मागते.||10||
🌺🌺🌺🌺🌺

कवयित्री.सौ.छाया भाऊसाहेब शेटे.
जव्हार.
पालघर.
(401603)
🌷8600223865🌷☘🌷☘🌷☘2|4|2017.🍀
☘रविवार🍀

🌺🌺आई🌺🌺

No comments:

Post a Comment

राज्यस्तर उपक्रमशील शिक्षिका समूह