WELCOME

onlyactiveteachers.blogspot.in राज्यस्तर उपक्रमशील शिक्षिका समूहाच्या वेबसाइटवर आपले सहर्ष स्वागत
animated-welcome-image-0114

शब्दांचे डोंगर

शाळा 
हि माझी शाळा आहे.
हि माझी जि.प.ची शाळा आहे.
हि माझी जि.प.ची शाळा धामणगावात आहे.
हि माझी जि.प.ची शाळा धामणगावात असून १ ते ८ वी आहे.



गुलाब.
हे गुलाबाचे फूल आहे.
हे गुलाबाचे फूल लाल आहे.
हे गुलाबाचे फूल लाल रंगाचे असून सुंदर आहे.
हे गुलाबाचे फूल सुंदर व लाल रंगाचे असून काटेरी आहे.



अननस.
हा अननस आहे.
हा अननस पिवळ्या रंगाचा आहे.
हा अननस पिवळ्या रंगाचा असून गोड आहे.
हा अननस पिवळ्या रंगाचा असून गोड व थोडा आंबट आहे.



मोर.
हा मोर आहे .
हा मोर रंगीबेरंगी आहे.
हा मोर रंगीबेरंगी व सुंदर आहे.
हा मोर रंगीबेरंगी व सुंदर असून पावसाळ्यात नाचतो.
हा मोर रंगीबेरंगी व सुंदर असून पावसाळ्यात थुई थुई नाचतो.



पोपट
हा पोपट पोपटी आहे.
हा पोपट पोपटी असून मिठू मिठू बोलतो.
हा पोपट पोपटी असून मिठू मिठू बोलतो व डाळीमबाचे दाणे खातो.



गाय.
हि गाय आहे.
हि गाय काळ्या पांढऱ्या रंगाची आहे.
हि गाय काळ्या पांढऱ्या रंगाची असून दूध देते.
हि गाय काळ्या पांढऱ्या रंगाची असून दूध देते व चारा खाते.



अंजली.
अंजली ही मुलगी आहे.
अंजली ही गुणी मुलगी आहे.
अंजली ही गुणी मुलगी अभ्यासु आहे.
अंजली ही गुणी मुलगी अभ्यासु असून नम्र आहे.



बाळ.
हे बाळ आहे.
हे रमेश नावाचे बाळ आहे.
हे रमेश नावाचे बाळ खूप हट्टी आहे.
हे रमेश नावाचे बाळ खुप हट्टी असून रडके आहे.



फळा.
हा फळा आहे.
हा फळा काळा आहे.
हा काळा फळा आमच्या शाळेत आहे.
हा काळा फळा आमच्या शाळेत असून आम्ही त्यावर लिहितो.



घर.
हे माझे घर आहे.
हे माझे घर खेडेगावात आहे.
हे माझे घर खेडेगावात असून छोटे आहे.
हे माझे घर खेडेगावात असून छोटे पण स्वच्छ आहे.



नाशिक.
हा नाशिक जिल्हा आहे.
हा नाशिक जिल्हा माझा आहे.
हा नाशिक जिल्हा माझा असून प्रगत आहे.
हा नाशिक जिल्हा माझा असून प्रगत व तंत्रस्नेही आहे.



कागद.
हा कागद आहे.
हा कागद कोरा आहे.
हा कागद कोरा असून तो माझ्या वाहिचा आहे.



गणवेश.
हा माझा गणवेश आहे.
हा माझा गणवेश निळ्या रंगाचा आहे.
हा माझा गणवेश निळ्या रंगाचा असून तो शाळेचा आहे.



गाडी.
ही गाडी आहे.
ही गाडी लाल रंगाची आहे.
ही गाडी लाल रंगाची असून दुचाकी आहे.
ही दुचाकी गाडी लाल रंगाची असून माझ्या सरांची आहे.



सर.
हे माझे सर आहेत.
हे माझे शाळेतले सर आहेत.
हे माझे शाळेतले जाधव सर आहेत.
हे माझे शाळेतले जाधव सर कडक शिस्तीचे आहेत.
हे माझे शाळेतले जाधव सर कडक शिस्तीचे असून गणितात ज्ञानी आहेत.

No comments:

Post a Comment

राज्यस्तर उपक्रमशील शिक्षिका समूह