WELCOME

onlyactiveteachers.blogspot.in राज्यस्तर उपक्रमशील शिक्षिका समूहाच्या वेबसाइटवर आपले सहर्ष स्वागत
animated-welcome-image-0114

बोधकथा

खरा न्याय*
  " एका गावात राम आणि शाम नावाचे दोन व्यापारी राहत असतात. ते एकमेकांचे खूप चांगले मित्र असतात. एक दिवस अचानक राम त्याची सर्व संपत्ती गमावतो. तो गरीब होतो. तो शामकडे मदतीसाठी येतो. शाम खूप दयाळू मानाने फार चांगला असतो. तो क्षणाचा हि विचार न करता,रामला आपल्या संपत्ती मधील अर्धा वाटा देऊन टाकतो.
शामच्या मदतीमुळे रामला फार आनंद होतो. तो शामला वाचन देतो कि, जेव्हा कधी तुला मदत लागेल तेव्हा मी तुला अवश्य मदत करीन. खूप वर्षानंतर शाम गरीब बनतो. त्याला रामची आठवण येते आणि तो मदतीच्या अपेक्षेने रामकडे जातो. परंतु राम त्याला मदत न करता घरातून हाकलून देतो
शामला खूप वाईट. राम खूप बदललेला असतो. शामच्या एका नौकाराने हे सर्व ऐकलेले असते. तो राजाकडे जातो आणि राजाला सर्व गोष्ट सांगतो. राजा सगळे ऐकून घेतो. सगळी माहिती काढतो.
राजा शामला आणि रामला बोलावतो. राजा रामला त्याच्या वचनाची आठवण करून देतो. राजा लगेच रामला आदेश देतो कि, त्याने त्याची अर्धी मालमत्ता शाम बरोबर वाटून घ्यावी शामला योग्य तो न्याय मिळतो. शामने रामला अर्धी मालमत्ता दिली होती तशीच राम शामला देतो. आता खरा न्याय होतो.
*तात्पर्य -*खरा न्याय करावा."

अनुकरण

 एकदा एका राजाचा हत्ती अचानक लंगडायला लागला. बरेच वैद्य, उपचार झाले पण हत्तीच्या चालण्यात काही फरक पडेना. राजा खूपच चिंताग्रस्त झाला. याच दरम्यान त्या नगरीत भगवान बुद्धांच्या भिक्खूसंघाचे आगमन झाले होते. त्यामुळे कोणीतरी राजाला हत्तीच्या लंगडण्याविषयी भगवान बुद्धांना भेटण्याचा सल्ला दिला. राजाने तथागतांची भेट घेतली.

भगवान बुद्धांनी परिस्थिती पाहिली आणि हत्तीचा माहुत बदलण्यास सांगितले. तथागतांचा उपदेश मानून राजाने माहुत बदलला आणि काय आश्चर्य? हत्ती व्यवस्थित चालू लागला. राजाला आश्चर्य वाटले. राजाने तथागतांना विचारले, तथागत अनेक वैद्यांच्या औषधोपचाराचा हत्तीवर परिणाम झाला नाही. मात्र आपल्या केवळ उपदेशाने हत्ती व्यवस्थीत चालू लागला याचे रहस्य काय? तेव्हा तथागत म्हणाले, "रहस्य काहीच नाही, या हत्तीचा जो माहुत तो लंगडत चालत होता. आणि हत्ती त्याचे अनुकरण करत होता. त्यामुळे हत्तीचा माहुत बदलणे गरजेचे होते.

आपली अवस्था अशीच आहे. आपण सद्‌सद्‌ विवेक बुद्धीने विचार न करता अशा अनेक बाबींचे अंधानुकरण करीत आहोत, त्यामुळेच आपली वाटचाल लंगड्या हत्ती प्रमाणे सुरू आहे. आपली वाटचाल सुव्यवस्थीत होण्यासाठी आपला माहुत सदाचारी असला पाहिजे

स्वकीयांकडून झालेला ञासाचे खरे दुःख* 🌺
=================                      
एक सोनार होता. त्याच्या दुकानासमोरच एका लोहाराचे दुकान होते. सोनार जेव्हा काम करत असे तेंव्हा सोनाराच्या दुकानातून हळू आवाज होत असे पण जेंव्हा लोहार काम करत असे तेंव्हा मात्र लोखंडाचे काम होत असल्याने मोठा आवाज होत असे. तो आवाज मोठा कर्णकर्कश असे. एके दिवशी सोनाराच्या दुकानातील एक सोन्याचा कण कसा कोण जाणे पण लोहाराच्या दुकानात जावून पडला. त्या सोन्याच्या कणाची भेट एका लोखंडाच्या कणाशी झाली. खूप दिवसांची ओळख असल्यासारखे ते एकमेकांशी बोलू लागले. सोन्याच्या कणाने लोखंडाच्या कणाला म्हंटले,"दादा, आपले दुःख तर खरे एकसमान आहे. दोघानाही आगीत तापवले जाते आणि हातोड्याने ठोकले जाते. मी तर बाबा चुपचाप हे सहन करतो, पण तुझे काय?" लोखंडाचा कण सोन्याच्या कणाकडे पाहून दुःखी स्वरात म्हणाला,"अरे ! तुझे म्हणणे अगदी बरोबर आहे. दोघानाही तापवणारी आग एकच आहे आणि ठोकणारा हातोडाहि एकाच धातूचा आहे. पण खरे दुःख याचे आहे कि तुला ठोकणारा हातोडा हा तुझा कोणीच लागत नाही पण मला ठोकणारा लोखंडाचा हातोडा हा नात्याने माझा भाऊच लागतो. दुसऱ्याने दिलेल्या दुःखापेक्षा स्वकीयांनी दिलेला त्रास हा अगदी हृदयात वार करून जातो."
                               *तात्पर्य*
*आपल्या माणसांकडून होणारा त्रास हा कायमच दुःखदायक वाटतो.*

एक सुंदर बोधकथा ...

*॥ भिक्षापात्र ॥*
---------------s----------------

"राजमहालाच्या दारात मोठा गदारोळ उडाला होता.
जवळपास सगळी नगरी तिथे लोटली होती.
प्रसंगच तसा होता.
त्या दिवशी भल्या सकाळी एक भिक्षुक राजाच्या महाली
भिक्षा मागण्यासाठी आला होता.
राजा म्हणाला, तू पहिला याचक आहेस आजच्या दिवसातला.
काय हवं ते माग. मिळेल.
भिक्षुक म्हणाला, माझ्याकडचं भिक्षापात्र फारच छोटं आहे.
त्यात बसेल एवढीच भिक्षा मला पुरेशी आहे.
पण, वचन देण्याआधी विचार कर.
जमेल का?
भिक्षुकाच्या हातातलं अतिशय छोटं भिक्षापात्र पाहून राजा हसून म्हणाला,
अरे याचका, माझ्याकडच्या संपत्तीची गणती नाही,
माझ्या राज्याला सीमा नाही. हे छोटंसं भिक्षापात्र भरण्यात काय अडचण.
राजाने नोकरांकरवी आपल्या खजिन्यातले उत्तमोत्तम जडजवाहीर मागवले
आणि त्यांनी ते भिक्षापात्र भरायला सांगितलं...
...संध्याकाळ उजाडली तरी ते भरणं सुरूच होतं...
...राजाचा सगळा खजिना रिता झाला होता,
आपल्या लाडक्या राजावर खजील होण्याची पाळी यायला नको,
म्हणून प्रजाजनांनी आणलेली त्यांच्या घरची संपत्तीही त्यात गायब झाली होती.
रात्र झाली तसा राजा भिक्षुकाच्या पायावर कोसळला आणि म्हणाला,
महाराज, माझ्याकडे हे पात्र भरण्याइतकी संपत्ती नाही.
भिक्षुक म्हणाला, अरेरे, उगाच माझा दिवस वाया गेला.
सकाळीच सांगितलं असतं तर पुढे गेलो असतो.
पात्र उलटे करून सगळी संपत्ती ओतून तो पुढे निघाला.
राजा धावत त्याच्या मागे गेला आणि हात जोडून त्याने विचारलं,
भगवन्, मला फक्त एक सांगा. या इतक्याशा भिक्षापात्रात
माझा सगळा खजिना रिता झाला, तरी ते भरलं नाही.
असं काय आहे या भिक्षापात्राचं वैशिष्ट्य?
भिकारी म्हणाला,
ते मलाही माहिती नाही.
हे भिक्षापात्र मी माणसाच्या कवटीपासून तयार केलं आहे.
त्यातच माणसाचं मन असतं म्हणतात.
आणि
ते

*कशानेही भरत नाही

〰〰〰〰〰〰〰
     *🌺 गैरसमज*  🌺
=================
एका जंगलात राम सावित्री नावाच एक जोडपं राहत असत,राम हा जंगलात जाऊन लाकूडे तोडायचा आणि ती जवळच्या शहरात जाऊन विकायचा...काही दिवसांनी त्यांच्या घरात एक सुंदर बाळ जन्माला येत.;
 एक दिवस त्याला जंगलात एक निरागस आणि घाबरलेल मुंगूसाच 
पिल्लू दिसत जवळच  कोणत्यातरी जंगली श्वापदाच्या हल्ल्यात त्याची आई मरून पडली होती..राम त्या पिल्लाला घरी आणतो.थोड्या दिवसांतच ते पिल्लू त्या घरात एखाद्या 
सदस्यां प्रमाणे रूळते...

एक दिवस राम नेहमीप्रमाणे जंगलात आपल्या कामासाठी न्याहारी करतो आणि  निघून जातो... नंतर थोड्या वेळाने  आपल्या बाळाला झोपवून  सावित्री  पाणी आणण्यासाठी निघून जाते.घरात फक्त बाळ आणि ते माणसाळलेल मुंगूस....
काही वेळातच त्या घरात एक भला मोठा साप शिरला आणि तो त्या बाळाकडे चाल करू लागला ...मुंगूसाने चपळाईने सापावर झडप मारली आणि सुरु झाली लढाई..साप पण बलाढ्य होता पण मुंगूसाने त्याच्यावर मात केली मुंगूसाचे   तोंड आणि पूर्ण शरीर सापाच्या रक्ताने  
माखले होते...आता मुंगूस दारात उभे राहून सावित्रीची वाट बघत होते.....तेवढ्यात सावित्री डोक्यावर हंडा घेऊन आली आणि बघते तर काय मुंगूसाचे तोंड आणि पूर्ण शरीर रक्ताने  माखले होते सावित्रीच्या डोक्यात एकच विचारांच वादळ ऊटल की तीच्या बाळाचे लचके त्या मुंगूसाने तोडले आणि त्याला मारुन  टाकले...पण मुंगूस मात्र सावित्रीकडे खूप निरागसपणे बघत होते. मात्र त्याचवेळी सावित्रीने बाळाच्या नावाने एकच टाहो फोडला आणि क्षणार्धात डोक्यावरील हांडा तीने त्या मुंगूसाच्या अंगावर फेकला आणि घरात पळत सुटली पण घरात जाताच तीला चित्र वेगळंच दिसलं तीच बाळ अजूनही झोपलच      
होत आणि शेजारीच तो भयानक साप रक्ताच्या थारोळ्यात मरून पडलेला....सावीत्री भानावर आली आणि सर्व प्रकार तिच्या लक्षात आला तशी ती चपळाईने उठली आणि बाहेर आली .पण  मुंगूस बिचारे जागेवर  ठार झालते.  सावित्रीने पुन्हा एकदा  टाहो फोडला पण यावेळी तीचे दोन्ही हात जोडलेले होते......

*तात्पर्यः जे दिसतय ते बघाव पण त्याचाआधी जे दिसत नाही ते शोधायचा प्रयत्न करावा*. 
*कारण गैरसमज हे जवळच्या माणसांकडूनच होतात.नंतर माञ फक्त पश्चाताप होतो.*
*-----------------------------------*
*📝 संकलन*
*✒श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
जि.प.प्रा.शा.वाटेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड

एक कथा

एक कथा वाचली... आवडली म्हणून आपणास पाठवत आहे...!

एकदा एक वाघ आणि वाघीण आपल्या पिलांना गुहेत सोडून शिकारीसाठी दूर जंगलात जातात. २ दिवस पर्यंत ते परत आलेच नाही. इकडे पिलांना खूप भूक लागली. कलकल ऐकून एका बकरीला त्यांची दया आली. तिने वाघिणीच्या पिलांना आपले दूध पाजले. पिलांच्या जीवात जीव आला. आता बकरी रोज येऊन त्यांना दूध पाजू लागली. एक दिवस पिले पोट भरल्यानंतर मस्ती करू लागली. तेव्हड्यात तिथे ७ दिवसानंतर वाघ आणि वाघीण परतले. बकरीला पाहून आयती शिकार मिळाल्याच्या आनंदात तिच्यावर वाघ झडप घालणार इतक्यात वाघाची पिले म्हणाली. आई-बाबा या शेळीने  आम्हाला दूध पाजून मोठे केलेय. ही नसती तर आम्ही मरून गेलो असतो. हिचे आपल्यावर खूप उपकार आहेत. तुम्ही तिला मारू नका.

पिलांचे ऐकून वाघ खुश झाला आणि तिला कृतद्न्यतेने म्हणाला. आम्ही तुझे हे उपकार विसरणार नाही. आता तू स्वतंत्रपणे आनंदाने जंगलात एकटी सुद्धा वावरू शकतेस.  कुणीही तुला त्रास देणार नाही. याची मी ग्वाही देतो. तेव्हा पासून सदर बकरी मोठ्या धाडसाने जंगलात स्वच्छंदी पणे कुठेही फिरू  लागली.

एकदा तर बकरीला वाघाच्या पाठीवर बसून उंच झाडांची पाने खातांना एका कबुत्तराने पाहिले आणि कुतूहलाने त्याने बकरीला या किमयेबद्ल विचारले. बकरीने त्या मोठ्या पक्षाला सर्व हकीकत सांगितली. उपकाराचे महत्व कबुत्तराच्या लक्षात आले. 
आपण पण असेच महान कार्य करायचे असे त्या कबुत्तराने मनातल्या मनात ठरवले.

एकदा कबुत्तर उडत असतांना त्याला काही उंदराची पिले दलदलीत फसलेली दृष्टीस पडतात. ती बाहेर पडायचा प्रयत्न करत असतात, पण ती अधिकच खोल जात होती. शेवटी कबुत्तर त्यांना अलगद बाहेर काढतो. उंदराची पिले ओली झालेली असतात. थंडीने कुडकुडत असतात. पक्षी त्यांना  आपल्या पंखात बऱ्याच वेळ चांगली ऊब घेतो. थोड्या वेळाने आपल्या घरट्या कडे जाण्यासाठी कबुत्तर उंदराच्या पिलांचा निरोप घेतो आणि भरारी घेण्याचा प्रयत्न करतो, पण काही केल्या त्याला उडता येईना... तो अस्वस्थ झाला आणि त्याने त्याचे कारण शोधले...!

 "उंदराच्या पिल्लांनी ऊब घेता घेता कबुत्तराचे संपूर्ण पंख कुर्तडलेले होते." फडफडत फडफडत कसाबसा कबुत्तर तेथून बकरी पर्यंत पोहचले आणि त्याने बकरीला विचारले..., "तू पण उपकार केलेस आणि मी पण उपकारच केले. पण  दोघांना वेगवेगळे फळ अर्थात अनुभव कसे मिळाले?"

बकरी हंसली आणि गंभीरपणे म्हणाली... 

_*"उपकार कधीही  वाघा सारख्या पुरुषी व्यक्तित्वावर करावेत, उंदरा सारख्या स्वार्थीवर नाहीत. कारण असे स्वार्थी लोक नेहमी आपल्या स्वार्थाकरिता दूसरा पर्याय शोधात असतात... स्वतःचा स्वार्थ साधला कि ते सच्च्या व प्रामाणिक माणसाला पण विसरण्यात स्वतःची धन्यता मानतात. मात्र पुरुषी स्वभावाचे निस्वार्थी आणि  बहादूर लोक आयुष्यभर उपकार करण्या-याला लक्षात ठेवतात..

         🎀 *कर्तव्य*🎀
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
           *एकदा एक श्रीमंत* माणूस नदीकाठावरील मारूती मंदिरात देवदर्शनासाठी गेला. अचानक त्याच्या मनात आले, नदीत जाऊन हात-पाय धुवावेत व मग मंदिरात देवदर्शनासाठी जावे. तो नदीवर गेला. हात-पाय धूत असताना त्याच्या तोल गेला आणि तो नदीत पडला. त्याला पोहता येत नव्हते. त्याची धडपड सुरू झाली. तो ओरडू लागला पण त्याला वाचविण्यासाठी कुणीही पुढे येईना.

अखेर एका साधूने नदीत उडी घेतली. त्या साधूने त्याला वाचविले. काठावर आणले. काही वेळाने तो श्रीमंत गृहस्थ भानावर आला. त्याने खिशातून खूप नोटा बाहेर काढल्या. पण त्यातील फक्त एक रूपयाची नोट साधूच्या हातावर ठेवली. हे पाहून काठावर जमलेले लोक संतापले. चिडून त्यांना थांबविले. त्यांनी त्या व्यापार्‍याला उचलले व नदीत टाकणार इतक्यात साधूने त्यांना थांबविले. साधू म्हणाला, ‘थांबा, त्यांने स्वत:च किंमतीएवढीच बक्षिसी दिली. यात त्याची का चूक? त्याची किंमत एवढीच आहे.’ 
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🎀 *तात्पर्य* : - *उपकार स्मरण करणे हे

*
     ▬▬▬▬ ❚❂❚❂❚▬▬▬▬
       ╭════════════╮
      🌈🌈 *बोधकथा* 🌈 🌈
       ╰════════════╯
              *❝फटकळ पणा❞*
🌾🌾🍃🥀🥀🥀🍃🌾🌾

       *_एका गावात एक शेतकरी राहत होता. शेती करण्याशिवाय त्याने काही गायी पाळल्या होत्या._*

        *_त्यांचे दूध विकून तो गुजराण करत असे. शेतकरी प्रामाणिक होता. त्यामुळे तो दुधात मुळीच भेसळ करत नसे. त्यामुळे त्याचे दूध चांगलेच असणार याची लोकांना खात्री पटली होती._*

       *_गावातील बहुतांश लोक त्याचेच ग्राहक होते. त्याच्या नियमित ग्राहकांमध्ये एक महिलादेखील होती. तिचा स्वभाव रागीट होता. शेतकर्‍याला तिचा स्वभाव माहीत होता. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत तो प्रथम तिच्या घरी दूध पोहोचवत असे._*

        *_एके दिवशी त्या महिलेने घरी पूजापाठ आयोजित केला होता. बरेच नातेवाईक येणार होते. परंतु नेमके त्या दिवशी शेतकरी तिच्या घरी दूध देण्यास जाऊ शकला नाही. शेतक-याच्या या वागण्यामुळे ती महिला प्रचंड संतापली. त्याच्या या वागण्याचा तिला खूप रागही आला. पर्यायी व्यवस्था करून तिने कार्यक्रम पार पाडला._*

          *_दुस-या दिवशी शेतकरी तिच्या घरी दूध घेऊन गेला. तेव्हा तिने त्याचा बराच पाणउतारा केला. बराच वेळ तिच्या तोंडाचा पट्टा सुरू होता. शेतकरी गप्प राहिला. काही वेळाने तिच्या रागाचा पारा किंचित कमी झाला, तेव्हा धाडस करून शेतकरी बोलला,_*
          
         *_‘माझ्यामुळे तुमची गैरसोय झाली. त्याबद्दल मी प्रथम आपली क्षमा मागतो. परंतु काल माझ्या आईचे निधन झाले. मला तिच्यावर अग्निसंस्कार करावे लागले. त्यामुळे मी दूध द्यायला येऊ शकलो नाही.’_*

          *_हे ऐकताच महिलेला तिची चूक उमगली. शरमेने तिला काहीच बोलता येईना. रागाच्या भरात भलतीच चूक आपण केल्याचा तिला पश्चात्ताप झाला. तिने शेतक-याची माफी मागितली व यापुढे मागचा-पुढचा विचार न करता कुणाशीही फटकळपणे न वागण्याची तिने शपथ घेतली._*
════════════════
     🌈  *❝ तात्पर्य ❞*
           *_Moral of the Story_* 🌈
════════════════
🌾🌾🍃🥀🥀🥀🍃🌾🌾
*अतिउत्साह, घाई-गडबडीत, समोरच्या व्यक्तीची अडचण जाणून न घेता अनुचित व्यवहार करणे योग्य नाही.*
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

🌷🙏🏻🌷शुभ सकाळ 🌷🙏🏻🌷

गाढव वाघाला बोलतो गवत पिवळ असत. वाघ बोलतो गाढवाला गवत हिरव असत. त्यांच्यात वाद होतो. ते सिंहाकडे जातात निवाडा करायला. दरबारात सर्व जमलेले असतात. गाढव शहाणपणा करत सर्वांना समोर सिंहाला बोलतो कि गवत पिवळ असत आणि हा वाघ बोलतो कि हिरव असत तुम्ही आता सांगा कि खर काय आणि खोट काय. सिंह स्मितहास्य करतो आणि सर्वांन समोर सांगतो की गाढव बरोबर बोलतो. गवत पिवळ असत.आणि वाघाला एक वर्षाची शिक्षा करतो. गाढव आनंदाने माकडउड्या मारत जंगलात निघून जात.
सर्व दरबार संपल्यावर वाघ जाऊन सिंहाला विचारतो कि तुम्हाला माहित आहे ना कि गवत हिरव असत तरीही का मला शिक्षा केली.सिंह बोलला कि मी शिक्षा तुला ह्यासाठी केली कारण तो गाढव आहे आणि हे सर्वांना माहीत आहे. आणि गवत हिरवच आहे ह्यात काहीच शंका नाही. पण तरीही तू एका गाढवा बरोबर वाद घालत बसून स्वतःच वेळ वाया घालवलास म्हणून तुला शिक्षा दिली.
*Moral of the Story : ध्येय गाठायच असेल तर विनाकारण वाद करण्यात वेळ घालत बसू नका. 

No comments:

Post a Comment

राज्यस्तर उपक्रमशील शिक्षिका समूह